मार्शल आर्टस वजन कमी करण्याचा उत्तम फंडा- अभिनेता अंकित गेरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 16:01 IST2017-03-15T10:31:46+5:302017-03-15T16:01:46+5:30

सिनेमा असो किंवा मालिका कलाकारांना त्यांच्या भूमिकेला साजेशा लुकसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. भूमिकेच्या लुकप्रमाणे व्यायाम करत वजन वाढवणे ...

Martial arts The best way to lose weight - actor Ankit Gera | मार्शल आर्टस वजन कमी करण्याचा उत्तम फंडा- अभिनेता अंकित गेरा

मार्शल आर्टस वजन कमी करण्याचा उत्तम फंडा- अभिनेता अंकित गेरा

नेमा असो किंवा मालिका कलाकारांना त्यांच्या भूमिकेला साजेशा लुकसाठी खूप मेहनत घ्यावी लागते. भूमिकेच्या लुकप्रमाणे व्यायाम करत वजन वाढवणे किंवा वजन घटवणे यांवर विशेष भर देताना दिसतात.योग्य डाएट फॉलो करत नियमीत व्यायाम,योगा करत मेहनत घेताना कलाकारा दिसतात.अग्निफेरा मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणारा अभिनेता अंकित गेराही सध्या त्याच्या शरीरयष्टीवर मेहनत घेताना दिसतोय.यावेळी त्याने योगा किंवा जीममध्ये तासनतास वर्कआऊट करत नसून मार्शल आर्टस शिकण्यावर सध्या तो आपले लक्षकेंद्रीत करत आहे.मार्शल आर्टस प्रशिक्षणा दरम्यान त्याने 10 किग्रँ वजन कमी केले आहे.याविषयी अंकित गेरा सांगतो,पडद्यावर तरूण दिसणे अत्यंत त्रासदायक असू शकते. मला वजन कमी करायचे होते.म्हणूनच मी मार्शल आर्टस शिकण्याचा निर्णय घेतला. मार्शल शिकण्याची माझी ब-याच वर्षापासून इच्छा होती. वजन कमी करण्यासाठी मार्शल आर्ट हा उत्तम पर्यायही आहे असे मला वाटले आणि प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.गेल्या चार महिन्यांपासून मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेत आहे.योग्य डाएटसह पुरेशी झोप होईल याचीही मी विशेष काळजी घेतो.त्यामुळे मला एक नवीन लुक आला आहे.माझा हा नवीन फिट लुक रसिकांनाही आवडेल याची मला खात्री असल्याचेही त्याने सांगितले.नव्या भूमिकेत रसिकांच्या भेटीस येण्यासाठी उस्तुक असल्याचेही अंकितने सांगितले.यापूर्वी अंकित गेरा  सपने सुहाने लडकपन के, महारक्षक देवी, संतोषी माँ यांसारख्या मालिकांमध्ये झळकला होता. अंकित मालिकांप्रमाणे बिग बॉस या कार्यक्रमातही झळकला होता. आता 'अग्निफेरा' मालिकेत अंकित अनुरागची भूमिका साकारत असून लंडनमधून भारतात परतलेला एक एमबीए विद्यार्थी आहे.  

Web Title: Martial arts The best way to lose weight - actor Ankit Gera