मिताली मयेकरच्या लग्नात 'या' मराठी अभिनेत्याने केलेलं तिचं कन्यादान, म्हणाला- "माझ्या आयुष्यात मुलं नाहीत..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 13:50 IST2026-05-18T13:46:43+5:302026-05-18T13:50:53+5:30

खऱ्या आयुष्यातही हे कलाकार एकमेकांसोबत नाती जपतात. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. जेव्हा मालिकेतल्या रिअल बाबांनी खऱ्या आयुष्यातही ऑन स्क्रीन लेकीचं कन्यादान केलं. मिताली मयेकरच्या बाबतीत असाच एक किस्सा घडला.

marathi actor umesh jagpat kanyadan of mitali mayekar on her wedding with siddharth chandekar | मिताली मयेकरच्या लग्नात 'या' मराठी अभिनेत्याने केलेलं तिचं कन्यादान, म्हणाला- "माझ्या आयुष्यात मुलं नाहीत..."

मिताली मयेकरच्या लग्नात 'या' मराठी अभिनेत्याने केलेलं तिचं कन्यादान, म्हणाला- "माझ्या आयुष्यात मुलं नाहीत..."

मराठी मनोरंजन विश्वात अनेक कलाकार एकमेकांचे मित्र असतात. याशिवाय खऱ्या आयुष्यातही हे कलाकार एकमेकांसोबत नाती जपतात. असंच एक उदाहरण समोर आलं आहे. जेव्हा मालिकेतल्या रिअल बाबांनी खऱ्या आयुष्यातही ऑन स्क्रीन लेकीचं कन्यादान केलं. हे अभिनेते आहेत उमेश जगताप आणि अभिनेत्री आहे मिताली मयेकर. उमेश-मिताली यांच्यातील हे खास नातं समोर आलंय. जे वाचून तुमचेही डोळे पाणावतील.

मज्जाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते उमेश जगताप यांनी हा खास किस्सा सांगितला. ते म्हणाले, ''लाडाची मी लेक गं नावाची मालिका मी करत होतो. त्यात माझ्या मुलीचं काम मिताली मयेकरने केलं होतं. सीन करताना ती आपल्या मुलीसारखीच आहे असं मला नेहमी वाटायचं. मी म्हटलं, माझ्या आयुष्यात मुलं नाहीत. आम्ही काय मुल नाही केलं. माझ्या भावाची दोन आहेत, तर म्हटलं बास्स झालं आपल्याला.''

''पण या क्षेत्रातली गंमत अशी आहे की, आपल्या आयुष्यात मुल नसताना सुद्धा आपल्याला या गोष्टी करता येतात. ती माझी मुलगी आहे असं मी फील करुन बोलतोय. तेव्हा ती म्हटली, बाबा, तू माझं कन्यादान कर. आणि मग मितालीच्या रिअल लग्नामध्ये मी तिचं कन्यादान केलं. मी आणि तिच्या वडिलांनी दोघांनी मिळून. आपल्या कलाक्षेत्रामुळे हे भाग्य मला लाभलं. त्यामुळे मला खूप गंमत येते की, अशी नातीही चांगली तयार होतात.'', अशी भावुक प्रतिक्रिया उमेश जगताप यांनी दिली. उमेश जगताप यांच्या या प्रतिक्रियेवर मितालीने 'लाडाचा माझा बाबा गं' अशी खास कमेंट करुन प्रेम दर्शवलं आहे.

Web Title : मराठी अभिनेता ने ऑन-स्क्रीन बेटी का 'कन्यादान' किया, पितृ इच्छा पूरी की।

Web Summary : मराठी अभिनेता उमेश जगताप ने अपनी ऑन-स्क्रीन बेटी मिताली मयेकर के वास्तविक विवाह में 'कन्यादान' किया। जगताप, जिनके अपने बच्चे नहीं हैं, ने शो के दौरान मयेकर के साथ एक गहरा संबंध महसूस किया और पिता की भूमिका निभाने के लिए सम्मानित महसूस किया।

Web Title : Marathi actor performs 'Kanyadaan' for on-screen daughter, fulfilling paternal desire.

Web Summary : Umesh Jagtap, a Marathi actor, performed the 'Kanyadaan' for his on-screen daughter, Mitali Mayekar, at her real wedding. Jagtap, who has no children of his own, felt a deep connection with Mayekar during their show and was honored to fulfill the fatherly role.