पहिल्या पत्नीचं निधन, कोरोनामध्ये दुसऱ्या पत्नीलाही गमावलं; इंडस्ट्रीतून गायब झाला 'हा' मराठी अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:36 PM2023-06-20T12:36:16+5:302023-06-20T12:37:37+5:30

लहान मुलाचा एकट्यानेच करतोय सांभाळ

marathi actor bhushan kadu away from industry after second wife death raising his son alone | पहिल्या पत्नीचं निधन, कोरोनामध्ये दुसऱ्या पत्नीलाही गमावलं; इंडस्ट्रीतून गायब झाला 'हा' मराठी अभिनेता

पहिल्या पत्नीचं निधन, कोरोनामध्ये दुसऱ्या पत्नीलाही गमावलं; इंडस्ट्रीतून गायब झाला 'हा' मराठी अभिनेता

googlenewsNext

2020 मध्ये कोरोना आला आणि हाहाकार माजला. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं. 2020 चं संकट संपतं तोच 2021 मध्ये दुसरी लाट आलीच. तेव्हाही अगदी तशीच परिस्थिती झाली. ऑक्सिजनची कमतरता, रुग्णालयांमध्ये अपुरे बेड्स अशा अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. दरम्यान कोरोनामुळे एका मराठी अभिनेत्याच्या पत्नीचं निधन झालं. आज तो अभिनेता फिल्मइंडस्ट्रीपासून आणि सोशल मीडियावरुनही कायमचा दूर गेलाय.

'बिग बॉस मराठी सिझन 1' मध्ये सहभागी झालेला अभिनेता भूषण कडू (Bhushan Kadu) आठवतोय? होय तोच सर्वांना खळखळून हसवणारा साधा सरळ भूषण. बिग बॉसच्या घरात त्याचा मुलगा भेटायला येतो त्या क्षणाने सर्वांचेच डोळे पाणावले होते. भूषणची पत्नी कादंबरी कडूचं 29 मे 2021 रोजी कोरोनाने निधन झालं. तिचं वय फक्त 39 वर्ष होतं. पत्नीच्या निधनाने भूषणला मोठा आघात झाला. त्यांना प्राकिर्थ हा लहान मुलगा आहे. हसत्या खेळत्या सुखी कुटुंबाचं मायेचं छत्रच हरपलं. भूषण त्यानंतर प्रसिद्धीझोतापासून गायबच झाला. ना त्याने सिनेमा, टीव्हीवर काम केलं ना तो सोशल मीडियावर दिसला. त्याने हातात असलेले सर्व प्रोजेक्ट्स सोडून दिले. यामुळे त्याचे चाहतेही काळजीत पडले. 

भूषणच्या पहिल्या पत्नीचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. यानंतर दुसऱ्या पत्नीचंही निधन झाल्यानं तो पुरता कोसळला. गेल्या वर्षी स्मिता गोंदकरने आयोजित केलेल्या एका पार्टीत भूषण बऱ्याच काळानंतर दिसला होता. त्याला सगळ्यांसोबत पाहून चाहत्यांनाही बरं वाटलं. सध्या भूषण एकटाच मुलाचा सांभाळ करत आहे. आजही तो इंडस्ट्रीपासून दूरच आहे.

भूषणने 'भूताची शाळा', 'हृदयात वाजे समथिंग', 'एक डाव भटाचा', 'बत्ती गुल पॉवरफुल', 'श्यामची मम्मी' या काही सिनेमांमध्ये भूमिका साकारली आहे.

Web Title: marathi actor bhushan kadu away from industry after second wife death raising his son alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.