कैसा हराया...! म्हणणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेला मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, 'हरा कर...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 10:54 IST2026-01-26T10:53:15+5:302026-01-26T10:54:01+5:30

अख्खा हिंदुस्तान हिरवा करुन टाका पण कसं? तर हे असं..., मराठी अभिनेत्याचा व्हिडीओ

marathi actor abhijit kelkar replies back to aimim corporator sahar shaikh on her kaise haraya remark | कैसा हराया...! म्हणणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेला मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, 'हरा कर...'

कैसा हराया...! म्हणणाऱ्या AIMIM च्या नगरसेविकेला मराठी अभिनेत्याचा टोला; म्हणाला, 'हरा कर...'

काही दिवसांपूर्वीच राज्यातील २९ महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या. १६ जानेवारी निकाल लागला. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या सहर शेख नगरसेविका म्हणून निवडून आल्या. जिंकून आल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात 'कैसा हराया' असं म्हणत विरोधकांना डिवचलं. तसंच येत्या काळात अख्खं मुंब्रा हिरवं करु असं आक्रमक वक्तव्यही केलं. या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी अभिनेताअभिजीत केळकरने सहर शेख यांच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. 

अभिनेता अभिजीत केळकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो बागेत काम करताना दिसत आहे. कुंडीत रोप लावताना तो सहर शेख यांच्याच शैलीत म्हणतो, "हरा कर दिया ना....अरे मी तर म्हणतो फक्त मुंब्रा नाही संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा. काय ताई...? नाही कळलं? अहो, आमच्यात पण हिरवं करतात...पण ते तसं नाही...असं...झाडे लावा, झाडे जगवा! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!"

अभिजीतने यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "फक्त मुंब्रा नको, अख्खा हिंदुस्थान, पृथ्वी 'हिरवी'गार करुन टाका...झाले लावा झाडे जगवा."


अभिजीतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दिला आहे. 'छान उत्तर दिलंस..जय महाराष्ट्र, जय शिवराय', 'भारी अभिजीत दादा...', 'ही हिरवळ आवडेल', ' अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. 

दरम्यान नगरसेविका सहर शेख यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत मुंब्रा हिरवा करु वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. 'आमच्या पक्षाचा झेंडाच हिरवा आहे म्हणून मी हिरवा म्हणाले. वेगळ्या रंगाचा असता तर त्या रंगाचा म्हणाले असते. माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करु नका.' तर याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एआयएमआयएमचे(AIMIM) अध्यक्ष इम्तियाज जलीलही उपस्थित होते. त्यांनी 'मुंब्राच काय अख्खा महाराष्ट्र हिरवा करु' असं वक्तव्य केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले. 

Web Title : AIMIM पार्षद के 'कैसा हराया!' पर अभिनेता का करारा जवाब।

Web Summary : AIMIM पार्षद की 'कैसा हराया!' टिप्पणी पर विवाद। मराठी अभिनेता अभिजीत केलकर ने पौधरोपण करते हुए पार्षद के बयान का उपहास उड़ाया और पर्यावरणवाद को बढ़ावा दिया।

Web Title : Actor's retort to AIMIM corporator's 'How we defeated!' remark.

Web Summary : AIMIM corporator's provocative 'How we defeated!' remark sparked outrage. Marathi actor Abhijit Kelkar responded with a video promoting environmentalism, planting trees, and satirizing the corporator's divisive statement.