न्यूयॉर्कच्या रंगात रंगून गेली शिवाली; वेस्टर्न आऊटफिटमध्ये शेअर केला भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 14:46 IST2023-07-18T14:45:28+5:302023-07-18T14:46:30+5:30

Shivali parab:या व्हिडीओच्या माध्यमातून तिने न्यूयॉर्कमधील काही मोजकी ठिकाणं चाहत्यांना दाखवली.

maharashtrachi hasyajatra fame shivali parab video viral on social media | न्यूयॉर्कच्या रंगात रंगून गेली शिवाली; वेस्टर्न आऊटफिटमध्ये शेअर केला भन्नाट व्हिडीओ

न्यूयॉर्कच्या रंगात रंगून गेली शिवाली; वेस्टर्न आऊटफिटमध्ये शेअर केला भन्नाट व्हिडीओ

छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) सध्याच्या घडीला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिची मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. सध्या शिवाली अमेरिका दौऱ्यावर असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ तिने नेटकऱ्यांसोबत शेअर केले आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शिवालीने इन्स्टाग्रामवर अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये ती न्यूयॉर्क सिटीमध्ये असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने न्यूयॉर्कमधील काही मोजकी ठिकाणं चाहत्यांना दाखवली. विशेष म्हणजे यावेळी तिचा वेस्टर्न आऊटफिटमधला लूक प्रचंड चर्चेत आला आहे.

दरम्यान, शिवाली आज मराठी कलाविश्वातील नावाजलेली व्यक्ती म्हणून ओळखली जाते. कल्याणमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या या मुलीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली. सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथिंग’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. 
 

Web Title: maharashtrachi hasyajatra fame shivali parab video viral on social media