आज शेवटचा सीन...! मालिकेला निरोप देताना भावुक झाली ‘अग्गंबाई सूनबाई’ची मॅडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 07:56 PM2021-08-19T19:56:58+5:302021-08-19T19:57:28+5:30

‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका आली आणि अल्पावधीत चर्चेत आली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

maddy aka bhakti ratnaparkhi share emotionl post about Aggabai Sasubai | आज शेवटचा सीन...! मालिकेला निरोप देताना भावुक झाली ‘अग्गंबाई सूनबाई’ची मॅडी

आज शेवटचा सीन...! मालिकेला निरोप देताना भावुक झाली ‘अग्गंबाई सूनबाई’ची मॅडी

googlenewsNext
ठळक मुद्देटीआरपी घसरल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवेदिता सराफ, गिरीश ओक, उमा पेंढारकर, अद्वैत दादरकर, मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘अग्गंबाई सूनबाई’  (Aggabai Sasubai) ही मालिका आली आणि अल्पावधीत चर्चेत आली. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. साहजिकच निरोप म्हटल्यावर कलाकार भावुक होणारच. मालिकेत मॅडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी (Bhakti Ratnaparkhi ) हिची अवस्थाही वेगळी नाही. मालिकेचं शेवटच्या दिवसाचं शूट संपल्यानंतर मॅडीनं सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली. इतकी निरागस मॅडी आता मला परत करायला नाही मिळणार, याचे खूप वाईट वाटतंय, अशा शब्दांत तिनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

टीआरपी घसरल्याने वाहिनीने ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये निवेदिता सराफ, गिरीश ओक, उमा पेंढारकर, अद्वैत दादरकर, मोहन जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

भक्ती लिहिते,
‘आज अग्गंबाई सूनबाईमध्ये माझा शेवटचा सीन आहे, म्हणजे मॅडीचा. ‘अग्गंबाई सासूबाई’पासून हा प्रवास सुरू झाला होता. मी खूप नशिबवान आहे की मला मॅडी हे इतकं गोड पात्र साकारायला मिळालं. तिचा निरागसपणा, तिचा वेडेपणा मला जगायला मिळाला. कशाचाही जास्त विचार न करणारी, सगळ्यांवर भरभरून नि:स्वार्थी प्रेम करणारी, सगळ्यांशी मैत्री करणारी आणि शेवटपर्यंत ती मैत्री टिकवणारी, आपल्यामधील लहान मूल नेहमी जपून ठेवणारी, इतकी निरागस मॅडी आता मला परत करायला नाही मिळणार, याचं खूप वाईट वाटतंय. मॅडीवर सगळ्यांनी खूप प्रेम केलंय. तुमच्या सर्वांचे त्यासाठी खूप आभार. निवेदिता सराफ ताई, गिरीश ओक सर तुमच्यासोबत मला कधी काम करायला मिळेल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तुमच्याकडून खूप शिकायला मिळालं. मोहन जोशी सर तुमचे आशीर्वाद असेच राहुदेत आणि तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला परत मिळू दे. उमा खूप मज्जा आली तुझ्यासोबत काम करून, खूप सुंदर काम केलंस तू. अद्वैत.. खूप कमी सीन्स होते आपले. पण जे काही सीन्स होते, त्यात मज्जा आली खूप. परत भेटू..लवकरच..एका नवीन भूमिकेत..., असं मॅडीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Web Title: maddy aka bhakti ratnaparkhi share emotionl post about Aggabai Sasubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.