​लीजा मलिक ‘सेल्युलर बाई’च्या अवतारात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 19:06 IST2016-07-06T13:36:22+5:302016-07-06T19:06:22+5:30

गायिका आणि अभिनेत्री लीजा मलिक हिली यापूर्वी आपण ‘लाईफ अनप्लग्ड’मध्ये पाहिले. आता लीजा पुन्हा एका नव्या शोमध्ये दिसणार आहे. ...

Lisa Malik in 'cellular bai'! | ​लीजा मलिक ‘सेल्युलर बाई’च्या अवतारात!

​लीजा मलिक ‘सेल्युलर बाई’च्या अवतारात!

यिका आणि अभिनेत्री लीजा मलिक हिली यापूर्वी आपण ‘लाईफ अनप्लग्ड’मध्ये पाहिले. आता लीजा पुन्हा एका नव्या शोमध्ये दिसणार आहे. होय, ‘अ‍ॅण्ड टीव्ही’वरील ‘लाईफ का रिचार्ज’मध्ये दिसणार आहे. लीजाचा ‘टीप टीप बरसा पानी’ हा अल्बम चांगलाच गाजला होतो. आता लीजा ‘लाईफ का रिचार्ज’मध्ये नव्या अवतारात दिसणार आहे. होय, महाराष्ट्रीय ‘सेल्युलर बाई’च्या अवतारात. लीजाचा हा नवा शो म्हणजे कॉमेडीचा फुल्ल तडका आहे. ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’ आणि ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’सारखा याही शोचा कनसेप्ट आहे. मात्र या सेलिब्रिटी प्रत्यक्ष हजेरी लावणार नाही. त्याऐवजी सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडिओंचा समावेश या शोमध्ये केला जाईल. लीजा आपल्या भूमिकेबाबत सांगताना म्हणाली, मी या शो मध्ये एका टेक्नो सॅव्ही टीपिकल महाराष्ट्रीयन महिलेची व्यक्तिरेखा साकारत आहे. ‘सेल्युलर बाई’ असे तिचे नाव. फॅशनेबल व सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या या ‘सेल्युलर बाई’वर मग सगळे पुरूष फिदा असतात.



 

 

Web Title: Lisa Malik in 'cellular bai'!