लीना जुमानीला ‘कोमोलिका’पासून मिळाली प्रेरणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2016 12:06 IST2016-06-22T06:36:58+5:302016-06-22T12:06:58+5:30

छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील अभिनेत्री लीना जुमानी साकारत असलेली 'तनु' ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतेय.खलनायिका भूमिका ...

Leena Jumaniel got inspiration from 'Comolica'! | लीना जुमानीला ‘कोमोलिका’पासून मिळाली प्रेरणा !

लीना जुमानीला ‘कोमोलिका’पासून मिळाली प्रेरणा !

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील अभिनेत्री लीना जुमानी
साकारत असलेली 'तनु' ही भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतेय.खलनायिका
भूमिका असूनही रसिकांची मनं लीना जुमानीनं जिंकलीत. ही भूमिका
साकारण्यासाठी लीनाला प्रेरणा मिळालीय ती कोमोलिकापासून.उर्वशी
ढोलकिया हिनं साकारलेली कोमोलिका छोट्या पडद्यावरील खलनायिकांच्या
भूमिकेतील माईलस्टोन ठरल्याचं लीनाला वाटतं. त्यामुळंच कोमोलिकाचा
अंदाज, स्टाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनय यानं छोट्या
पडद्यावरील खलनायिका म्हणून नवे मापदंड रचल्याचं लीनानं सांगितलंय.
याआधी कायमच पॉझिटिव्ह भूमिका साकारणा-या लीनासाठी अशाप्रकारची निगेटिव्ह
भूमिका मोठी आव्हानात्मक होती. मात्र एक आव्हान म्हणून लीनानं ही भूमिका
स्वीकारली आणि अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळवलंय.

Web Title: Leena Jumaniel got inspiration from 'Comolica'!