​जाणून घ्या कसे सुरू झाले शशांक केतकर आणि प्रियांका ढवळेचे प्रेमप्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 15:42 IST2018-01-03T10:12:04+5:302018-01-03T15:42:04+5:30

होणार सून मी या घरची या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांक केतकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही मालिका सुरू असतानाच ...

Learn How To Start Premature Love Of Shashank Ketkar And Priyanka Dhawal | ​जाणून घ्या कसे सुरू झाले शशांक केतकर आणि प्रियांका ढवळेचे प्रेमप्रकरण

​जाणून घ्या कसे सुरू झाले शशांक केतकर आणि प्रियांका ढवळेचे प्रेमप्रकरण

णार सून मी या घरची या मालिकेतील श्री या भूमिकेमुळे शशांक केतकरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही मालिका सुरू असतानाच या मालिकेत जान्हवीची व्यक्तिरेखा साकारणारी तेजश्री प्रधानसोबत त्याचे सूत जुळले आणि त्यांनी ही मालिका सुरू असतानाच लग्न केले. पण त्यांच्यात काहीच महिन्यात खटके उडू लागले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर देखील शशांक आणि तेजश्री होणार सून या घरची या मालिकेत काम करत होते. 
शशांकच्या घटस्फोटानंतर त्याच्या आयुष्यात प्रियांका ढवळे आली आणि तिने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. प्रियांका आणि शशांकने नुकतेच लग्न केले असून त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शशांक आणि प्रियांकाची पहिली भेट ही सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. शशांक आणि प्रियांका हे फेसबुकवर एकमेकांचे फ्रेंड्स असल्याने ते फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी गप्पा मारत असत. सुरुवातीला ते अनेक तास गप्पा मारत असत. पण नंतर त्यांच्यातील बोलणे खूप कमी झाले. शशांक अनेक चित्रपटांच्या आणि मालिकांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असल्याने त्याला तिच्याशी बोलायला वेळ मिळत नसे. शशांक सोशल मीडियाचा वापर खूपच कमी करतो आणि त्यातही दरम्यानच्या काळात त्याने त्याचे व्हॉटसअॅप देखील बंद केले होते. त्यामुळे त्याचे प्रियांकासोबत बोलणे खूपच कमी झाले होते. पण या दुराव्याचा त्यांच्या नात्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट दिवसेंदिवस त्यांचे नाते अधिकच घट्ट होत गेले. प्रियांका ही एक खूप चांगली डान्सर आहे. तिने भरतनाट्यमचे धडे देखील गिरवलेले आहे. त्यामुळे कलेविषयी तिला प्रचंड प्रेम आहे. शशांक तिला सगळ्याच चांगली क्रिटिक मानतो. तो कोणत्या गोष्टीत चुकत असेल तर ती लगेचच त्याला सांगते. प्रियांका ही डान्सर असल्याने कलाक्षेत्राशी संबंधितच आहे आणि त्यामुळेच तिला भविष्यात अभिनयक्षेत्रात चांगली संधी मिळाली तर या क्षेत्रात काम करायचे असे तिने ठरवले आहे.

Also Read : प्रिन्सेस लूकमध्ये दिसली शशांक केतकरची पत्नी, पाहा असा होता अंदाज 

Web Title: Learn How To Start Premature Love Of Shashank Ketkar And Priyanka Dhawal