'कृष्णाईच्या लेकी’! सुरु होणार नवी मालिका, अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार मुख्य भूमिकेत; प्रेक्षक उत्सुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:38 IST2026-05-15T10:36:43+5:302026-05-15T10:38:26+5:30
"लेकींच्या सुखात तिला आपलं सुख लाभतं…", निवेदिता सराफ यांची नवी मालिका, 'कृष्णाईच्या लेकी’चा प्रोमो व्हायरल

'कृष्णाईच्या लेकी’! सुरु होणार नवी मालिका, अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार मुख्य भूमिकेत; प्रेक्षक उत्सुक
Krushnaichya Leki: टीआरपीच्या यादीत टिकून राहण्यासाठी छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नव-नवीन ट्विस्ट आणले जातात. मालिकेच्या कथानकाला वळण दिलं जातं. मालिकेमध्ये काही नवीन पात्र आणली जातात. तर कधी नव्या मालिकांची घोषणा केली जाते. छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका येत आहेत. त्यात आता आणखी एका मालिकेची भर पडणार आहे.'कृष्णाईच्या लेकी' ही माय लेकींच्या नात्याची गोष्ट सांगणारी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या मालिकेत अभिनेत्री निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका आहे. या मालिकेतून त्या बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक करणार आहेत.
'कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये नायिका घरातील सगळी जबाबदारी खंबीरपणे सांभाळताना दिसतेय.नुकताच सोशल मीडियावर झी मराठी वाहिनीने या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. यामधून अभिनेत्री निवेदिता सराफ यांची पहिली झलक पाहायला मिळतेय. "लेकींच्या सुखात तिला आपलं सुख लाभतं, एका आईला आणखी काय हवं असतं?नवी मालिका - कृष्णाईच्या लेकी लवकरच आपल्या झी मराठीवर…", असं कॅप्शन देत हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेची तारीख अन् वेळ याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येईल. शिवाय, या मालिकेत निवेदिता सराफ यांच्यासह कोण-कोण झळकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.