असे केले प्रेरणाने (एलिना) बर्थ डे सेलिब्रेशन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2016 12:04 IST2016-10-29T12:02:48+5:302016-10-29T12:04:04+5:30

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मलिकेतील प्रेरणा परवार अर्थात एलिनाचे सेलिब्रेशन संपता संपत नाही.त्याला कारणही तसेच आहे. एक ...

Kelly Pryana (Elina) Birth Day Celebration! | असे केले प्रेरणाने (एलिना) बर्थ डे सेलिब्रेशन !

असे केले प्रेरणाने (एलिना) बर्थ डे सेलिब्रेशन !

'
;कुछ रंग प्यार के ऐसे भी' मलिकेतील प्रेरणा परवार अर्थात एलिनाचे सेलिब्रेशन संपता संपत नाही.त्याला कारणही तसेच आहे. एक तर सेटवर दिवाळीचे जोरात सेलिब्रेशन होत असतांना तिचा वाढदिवसाचेही खास सेलिब्रेशन करण्यात आले. सेटवर केक कटींग करत तिला तिच्या सहकलाकरांनी वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट्सही दिले आहेत. त्यामुळे एलिनाचा आनंद द्विगुणित झाला आहे. एलिनाने तिचे बर्थडे सेलिब्रेशनचे खास फोटो तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केलेत. सोशल मिडियावर सध्या एलिनावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. एकीकडे तेजोमय दिवाळी आणि दुसरीकडे वाढदिवसाचे सेलिब्रेशन असा दुहेरी आनंद प्रेरणाने सेटवर साजरा केला. सेटवर प्रेरणाची चुलत बहिण केक घेवून आली होती. केक कटींग करताच प्रेरणाच्या चेह-यावर केक लावण्यात आला. थोडा वेळ तरी केक एकमेकांना लावत मजा मस्ती करण्यात सारेच बिझी होते. सेटवर सेलिब्रेशन झाल्यानंतर तिने तिच्या घरीही  दणक्यात सेलिब्रेट केला. यावर्षी तिचा भावाला तिला प्रत्यक्ष भेटता आले नसल्यामुळे खास वहिनी आणि भावाने व्हिडीओ मेसेज पाठवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावर्षी भवाकडून आलेला  हा व्हिडीओ मसेजच सगळ्यात सुंदर गिफ्ट असल्याचे तिने सांगितले. दरवर्षी प्रमाणे माझ्या मित्रांनी, कुटुंबानी खूप स्पेशल बनवला त्यासाठी प्रेरणाने सा-यांचे आभारही मानलेत. 

Web Title: Kelly Pryana (Elina) Birth Day Celebration!