​बेहदमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी जेनिफर विंगेट पडली कोणाच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 14:48 IST2017-01-10T14:48:54+5:302017-01-10T14:48:54+5:30

बेहद ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेतील ...

Jennifer Wingate, who played a major role in the romance, fell in love with whom? | ​बेहदमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी जेनिफर विंगेट पडली कोणाच्या प्रेमात?

​बेहदमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी जेनिफर विंगेट पडली कोणाच्या प्रेमात?

हद ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे. या मालिकेतील जेनिफरच्या भूमिकेचे तर सगळेच कौतुक करत आहे. या मालिकेत जेनिफरच्या व्यक्तिरेखेला थोडीशी ग्रे शेड आहे. जेनिफर तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अशाप्रकारची भूमिका साकारत आहे. ही भूमिका साकारताना तिला खूप मजा येत आहे.
जेनिफरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने अतिशय सुंदर लाल रंगाचा गाऊन परिधान केला आहे. या फोटोच्या खाली तिने एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. तिने हे कॅप्शन लिहिताना बेहदमधील तिच्या व्यक्तिरेखेला समोर ठेवले आहे.
बेहद या मालिकेत सध्या जेनिफर म्हणजेच माया अर्जुनच्या प्रेमात पडली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. मालिकेच्या सुरुवातीपासून माया प्रेक्षकांना केवळ पांढऱ्या कपड्यांमध्ये पाहायला मिळाली होती. पण प्रेमात पडल्यापासून आता ती रंगीबेरंगी कपडे घालू लागली आहे. प्रेमात पडल्यापासून तिला पांढरे नव्हे तर रंगीबेरंगी कपडे आवडायला लागले आहेत. त्यामुळेच या गोष्टीचा विचार करून तिने तिच्या फोटोच्याखाली म्हटले आहे की, मायाने आता लाल रंगाचे कपडे घातले असून त्यात ती खूपच छान दिसत आहे. 
जेनिफर नुकतीच कुशाल टंडन आणि अनेरी वजानी यांच्यासोबत मॉरिशियसला बेहद या मालिकेचे चित्रीकरण करण्यासाठी गेली होती. मॉरिशियसमध्ये या मालिकेतील अतिशय महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण करण्यात आले. अर्जुनवर माया प्रेम करते याची जाणीव तिला झाल्याने मालिकेच्या कथानकाला एक कलाटणी मिळाली आहे. याच महत्त्वाच्या भागाचे चित्रीकरण तिथे करण्यात आले आहे. 




Web Title: Jennifer Wingate, who played a major role in the romance, fell in love with whom?