"तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना...;" वर्षा उसगावकरांना 'ओव्हरॲक्टिंग' म्हणत जान्हवी त्यांच्यावर बरसली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 09:15 IST2024-08-10T09:15:22+5:302024-08-10T09:15:38+5:30
काल बिग बॉस मराठीच्या घरात जान्हवी किल्लेकरचा वर्षा उसगावकरांवर चांगला राग निघाला. या वादात कोण चूक कोण बरोबर हे आज रितेश देशमुख सांगेलच (bigg boss marathi 5)

"तुम्हाला पुरस्कार देऊन त्यांना...;" वर्षा उसगावकरांना 'ओव्हरॲक्टिंग' म्हणत जान्हवी त्यांच्यावर बरसली
बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिझनमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काही वादविवाद होताना दिसत आहेत. बिग बॉस मराठीच्या नवीन सिझनमध्ये काल कल्ला टीव्हीमध्ये उर्वरित सदस्यांचे परफॉर्मन्स झाले. परफॉर्मन्स झाल्यावर जान्हवी आणि वर्षाताईंमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी जान्हवीने वर्षाताईंचा अभिनय आणि त्यांना मिळालेले पुरस्कार यावर बोट ठेवलं. काय घडलं नेमकं बघा.
जान्हवी वर्षाताईंवर संतापली कारण...
झालं असं की, गार्डन एरियामध्ये जान्हवी, निक्की, वैभव हे सर्वजण बसले होते. तेव्हा जान्हवी आर्याला उद्देशून निर्लज्ज असं म्हणाली. तेव्हा वर्षा उसगावरकर दुसऱ्या ग्रुपसोबत बाजूला बसल्या होत्या. त्या "निर्लज्जम समर्पयामी" असं म्हणाल्या. हे ऐकताच जान्हवी वर्षाताईंवर बरसली. ती म्हणाली, "ताई मी तुमचा पहिल्या दिवसापासून रिस्पेक्ट करत आलीय. माझ्या नादी लागू नका. पोरं बसतात तिथे तुम्ही केस उडवत येता. तुमची घाणेरडी ॲक्टिंग मला नका दाखवू."
वर्षाताईंचं जान्हवी प्रत्युत्तर
जान्हवी बोलत असताना वर्षा उसगावकर तिच्या प्रत्येक वाक्याला उत्तर देत होत्या. त्या म्हणाल्या, "मी इथे १०० दिवस टिकणार नंतर बाहेर जाणार. फालतू गोष्टींना मी दुर्लक्ष करते. काय तुझी ही गलिच्छ भाषा. याच ॲक्टिंगमुळे मला राज्य शासनाचा पुरस्कार मिळालाय. तोही तीन वेळा." हे बोलल्यानंतर जान्हवी म्हणाली, "तुम्हाला पुरस्कार देणाऱ्यांना आज पश्चाताप होत असेल की, आपण कोणाला पुरस्कार दिला म्हणून." वाद टोकाला जाताना अंकिताने भांडण शांत करण्याचा प्रयत्न केला. "तू त्यांच्या ॲक्टिंगला नको बोलू." असं अंकिता जान्हवीला म्हणाली. अशाप्रकारे वर्षाताई-जान्हवीमध्ये टोकाचं भांडण झालं.