​ही अभिनेत्री बनणार ‘डॉ. भानुमती ऑन ड्युटी’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 11:07 IST2016-07-09T05:37:44+5:302016-07-09T11:07:44+5:30

डॉ. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेला कविता कौशिकनं टाटा-बाय बाय केल्याचं एव्हाना सगळ्यांनाच माहित झालंय. मालिकेतील व्यक्तीरेखेवर असमाधानी असल्याचं ...

It will become an actress. Pandora on duty '! | ​ही अभिनेत्री बनणार ‘डॉ. भानुमती ऑन ड्युटी’ !

​ही अभिनेत्री बनणार ‘डॉ. भानुमती ऑन ड्युटी’ !

. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेला कविता कौशिकनं टाटा-बाय बाय केल्याचं एव्हाना सगळ्यांनाच माहित झालंय. मालिकेतील व्यक्तीरेखेवर असमाधानी असल्याचं सांगत कवितानं यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. तसंच या मालिकेतील काही संवाद एफआयआर मालिकेतून चोरल्याचा आरोप करत कवितानं डॉ. भानुमती ऑन ड्युटीमधून एक्झिट घेतली. आता या मालिकेत सीता फेम अभिनेत्री डेबिना बॅनर्जीची एंट्री होणार आहे.. डेबिना नवी डॉ. भानुमती साकारणार आहे. अभिनेता गुरमित चौधरीची पत्नी असलेल्या डेबिनासाठी हा एक वेगळा अनुभव असेल. कविताच्या एक्झिटनंतर श्वेता तिवारी नवी डॉ. भानुमती असेल असं बोललं जात होतं.मात्र निर्मात्यांची पसंती डेबिनाला मिळालीय. 

Web Title: It will become an actress. Pandora on duty '!