भारतीय सैन्याला ‘सॅल्यूट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 17:56 IST2016-12-02T17:05:17+5:302016-12-02T17:56:19+5:30

सतीश डोंगरे भारत-पाकमधील तणावपूर्ण स्थितीमुळे सध्या सीमा भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या तुलनेत सर्वच पातळ्यांवर उजवी बाजू ...

Indian Army 'Salute' | भारतीय सैन्याला ‘सॅल्यूट’

भारतीय सैन्याला ‘सॅल्यूट’

<
strong>सतीश डोंगरे


भारत-पाकमधील तणावपूर्ण स्थितीमुळे सध्या सीमा भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या तुलनेत सर्वच पातळ्यांवर उजवी बाजू असलेल्या भारताला ही स्थिती हाताळण्यास फारसा वेळ लागणार नाही. १९७१ आणि १९९९च्या कारगील युद्धात आपण हे दाखवूनही दिले आहे. त्यामुळे पाकने कुरापती काढणे बंद करायला हवे. भारतीय लष्काराच्या संयमाची परीक्षा बघू नये. कारण ज्या पद्धतीने आपल्या सैन्याने आतापर्यंत स्वत:वर नियंत्रण ठेवले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी त्यांना माझे सॅल्यूट..., अशी भावना अभिनेता पुरब कोहली याने व्यक्त केली. ‘पीओडब्ल्यू बंदी युद्ध के’ या सैनिकाच्या जीवनावर आधारित असलेल्या मालिकेनिमित्त सैनिकांचे आयुष्य जवळून अनुभवता आल्याचे ‘सीएनएक्स’च्या व्यासपीठावर सांगितले. त्याच्याशी साधलेला संवाद... 

प्रश्न : ‘पीओडब्ल्यू बंदी युद्ध के’ या मालिकेनिमित्त तुला सैनिकांचे आयुष्य जवळून बघता आले, काय अनुभव सांगशील?
- भारतीय लष्करात माझे काही मित्र आहेत. त्यांच्याशी, बोलण्याचा वा भेटण्याचा नेहमीच योग येत असतो. कारगिललाही मी भेट दिलेली आहे. मात्र ‘पीओडब्ल्यू’च्या निमित्ताने खºया अर्थाने मला भारतीय लष्कराचे सामर्थ्य आणि सैन्याचे जीवन जवळून बघण्याचे अन् अनुभवण्याची संंधी मिळाली. सैन्याचे जीवन कसे असते, हे शब्दात सांगणे अवघड आहे. कठीण प्रसंगात भारत मातेचे रक्षण करणारे सैनिकच खºया अर्थाने देशाचे हिरो आहेत. ‘पीओडब्ल्यू’ मालिकेत कारगिल युद्धाच्या प्रसंगी पाकमध्ये बंदी असलेल्या सैन्याची भूमिका साकारताना मला स्वत:वर अभिमान वाटत आहे. 

प्रश्न : मालिकेत भारदस्त स्टारकास्ट आहे, यामागाचे काही कारण?
- टीव्ही जगतात पहिल्यांदाच अशा आशयावर आधारित मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहचविली जात आहे. मालिकेत संध्या मृदुला, अमृता पुरी, सत्यदीप मिश्रा, मनीष चौधरी यांच्यासह माझी भूमिका आहे. ही मालिका इस्त्रायलची टीव्ही मालिका ‘गिडियन रॉफ के हॉटुफिम’ यावर आधारित असून, दोन भारतीय सैनिकांची कथा यात दाखविण्यात आली आहे. कारगिल युद्धाप्रसंगी दोन सैनिकांना पाकमध्ये बंदीवासात ठेवले जाते. त्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून दिला जाणारा संघर्ष यात दाखविण्यात आला आहे. तब्बल १७ वर्षांनंतर या सैनिकांची सुटका होते. हरलीन-सरताज आणि नाजनीन-इमान या दोन जोड्यांच्या अवतीभोवती मालिकेची कथा फिरत असून, ‘कोण आहेत खरे युद्धबंदी’ असा प्रश्न प्रेक्षकांसमोर उपस्थित होतो.  

प्रश्न : भारत-पाकमधील तणावपूर्ण स्थितीवर तू काय भाष्य करशील?
- १९७१ व १९९९ च्या कारगिल युद्धात पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरही त्यांच्याकडून कुरापती सुरूच आहेत. वास्तविक भारत पाकच्या तुलनेत लष्करी ताकद, क्षेपनास्त्रे अशा सर्वच पातळ्यांवर पुढे आहे. सर्जिकल स्ट्राइकने हे दाखवूनही दिले आहे. त्यामुळे पाकने स्वत:चे परीक्षण करायला हवे. मात्र अशा स्थितीतही मला असे वाटतेय की, दोन्ही देशात युद्ध हे यावरचे सोल्यूशन नव्हे. भारत हा पाकच्या तुलनेत बलाढ्य देश असल्याने पाकने आपल्यात सुधारणा करावी. कारण त्यांनी आपल्या लष्कराच्या सैन्याच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असे मला वाटतेय. 

प्रश्न : पाक कलाकारांवरील बंदी योग्य की अयोग्य?
- दोन देशांमधील सौहार्दपूर्ण संबंध वृद्धिंगत करण्यासाठी ‘कला’ ही नेहमीच प्रभावी ठरली आहे. त्यामुळे कलेवर बंधने लादने फारसे समर्थनार्थ नाही. कलाकार हा नेहमीच आपल्या कलेने लोकांना आपलेसे करत असतो. पाकिस्तानी कलाकारदेखील त्याचाच एक भाग आहेत. त्यामुळे कलाकार किंवा क्रिकेटवरील बंदी दोन्ही देशांमधील संबंधात सुधारणा घडवून आणतील असा जर विचार पुढे येत असेल तर तो चुकीचा आहे. 

प्रश्न : सरकारच्या भूमिकेबाबत तुझे मते काय?
- गेल्या काही दिवसांमध्ये सरकारने घेतलेल्या निर्णयांचा विचार केल्यास ते याविषयी गंभीर आहेत, हे निश्चित. सर्जिकल स्ट्राइक त्याचे उत्तम उदाहरण सांगता येईल. विशेषकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकांचे कौतुक करायला हवे. आतापर्यंत पाकच्या दहशतवादी कारवायांना भारतीय लष्कराने चोख प्र्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे पाकने आपल्या वर्तणुकीत सुधारणा करावी. कारण भारत सरकार आणि भारतीय लष्कर अजूनही संयमाच्या भूमिकेत आहे. पाकिस्तानने चुकूनही याचा उलट विचार करू नये. 

प्रश्न : तुझ्या आगामी प्रोजेक्टविषयी काय सांगशील?
- सध्यातरी पीओडब्ल्यू या मालिकेकडे मी लक्ष केंद्रित केले आहे. तसेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत ‘नूर’ या चित्रपटाची शूटिंगही सुरू केली आहे. त्याचबरोबर इतरही काही प्रोजेक्टवर मी काम करीत असून, आगामी काळात त्याबाबतची माहिती समोर येईलच.

Web Title: Indian Army 'Salute'