हृता दुर्गुळेच्या वाढदिवसानिमित्त पती प्रतिक शहाने लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला- जसजसे आपण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 13:50 IST2022-09-12T12:17:06+5:302022-09-12T13:50:05+5:30

महाराष्ट्राची क्रश असलेल्या ह्रता दुर्गुळेचा आज वाढदिवस साजरा करते आहे. त्यानिमित्त तिचा पती प्रतिक शहाने एक रोमाँटिक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे,

Hruta Durgule husband Prateek Shah share for her special post | हृता दुर्गुळेच्या वाढदिवसानिमित्त पती प्रतिक शहाने लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला- जसजसे आपण...

हृता दुर्गुळेच्या वाढदिवसानिमित्त पती प्रतिक शहाने लिहिलेली खास पोस्ट, म्हणाला- जसजसे आपण...

उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (hruta durgule). छोटा पडदा गाजवल्यानंतर हृता लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या तिला चित्रपटामध्ये पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. हृतादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी प्रोजेक्ट्स वा पर्सनल लाइफविषयी माहिती देत असते. महाराष्ट्राची क्रश असलेल्या ह्रता दुर्गुळेचा आज वाढदिवस साजरा करते आहे. यानिमित्त तिच्या पतीने एक खास पोस्ट तिच्यासाठी शेअर केली आहे. 

प्रतिकची पोस्ट
ह्रताच्या वाढदिवसानिमित्ता पती प्रतिक शहानं सोशल मीडियावर तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय. जसजसे आपण एक वर्ष मोठे होतो तसे अधिक जबाबदार होतो !! तुला आयुष्यातील सर्व सुख आणि यश मिळू देत. अशा शब्दांत प्रतिकने ह्रताला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

हृताचा जन्म 12 सप्टेंबर 1993 साली मुंबईत झाला. मुंबईच्या रामनारायण रुईया कॉलेजमधून हृतानं शिक्षण पूर्ण केलं. तिनं पत्रकारीतेत डिग्री मिळवली आहे. ह्रताने छोट्या पडद्यापासून आपली करिअरची सुरुवात केली. 

दरम्यान, हृता आणि प्रतिकने कुटुंबाच्या संमतीने आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधली. हृताच्या लग्नामुळे चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला होता. परंतु, सगळ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. २४ डिसेंबर २०२१ रोजी या दोघांनी साखरपुडा केला होता. प्रतीक शाह हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. 'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यासारख्या मालिकांचे दिग्दर्शन त्याने केले आहे.
 

Web Title: Hruta Durgule husband Prateek Shah share for her special post