​गोपी बहू वेड्याच्या रुग्णालयात ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 13:29 IST2016-08-20T07:59:18+5:302016-08-20T13:29:18+5:30

छोट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथियाँ' मालिकेत लवकरच अहेम अर्थात मोहम्मद नझीमची रि-एंट्री होणार आहे. अहेमच्या एंट्रीमुळं रसिकांना आनंद होत ...

Gopi bahusa hospital? | ​गोपी बहू वेड्याच्या रुग्णालयात ?

​गोपी बहू वेड्याच्या रुग्णालयात ?

ट्या पडद्यावरील 'साथ निभाना साथियाँ' मालिकेत लवकरच अहेम अर्थात मोहम्मद नझीमची रि-एंट्री होणार आहे. अहेमच्या एंट्रीमुळं रसिकांना आनंद होत असला तरी त्यांना एक धक्का बसणार आहे. कारण त्यांची लाडकी गोपी बहू मात्र वेड्याच्या रुग्णालयात जाणार आहे. लवकरच या मालिकेत कृष्णा (खालिद सिद्दीकी) याचं खरं रुप गोपी समोर येणार आहे. कृष्णाचा खलनायक अवतार पाहून गोपी बहूलाही धक्का बसणार आहे. त्यानंतर कृष्णा, प्रमिला (उत्कर्षा नाईक) आणि मानसी (काजल पिसाळ) गोपीला एका बंद खोलीत कैद करुन ठेवतात. कोकीला आणि मोदी कुटुंबीयांशी तिचा संपर्क होऊ देत नाही. हे तिघंही गोपी बहूला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करणार आहेत. तिथं तिला वीजेचे शॉकही दिले जाणार आहेत. त्यामुळं आता मालिकेत गोपी बहू वेडी बनणार का ?, त्यानंतर रिएंट्री होणा-या अहेम ज्याचं नवं नाव जग्गी असं असेल, तो मालिकेत काय ट्विस्ट आणणार याची उत्तर आगामी मालिकेत मिळणार आहेत.  

Web Title: Gopi bahusa hospital?