रात्रीस खेळ चाले संपणार!

By Admin | Updated: June 1, 2016 02:44 IST2016-06-01T02:44:11+5:302016-06-01T02:44:11+5:30

गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावर भास, आभास, विश्वास आणि अविश्वास खेळ पाहायला मिळतोय. ऐकीव, काल्पनिक गोष्टींवर आधारित असलेली रात्रीस खेळ चाले ही झी मराठी वाहिनीवरील मालिका.

The game will end in the night! | रात्रीस खेळ चाले संपणार!

रात्रीस खेळ चाले संपणार!

गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावर भास, आभास, विश्वास आणि अविश्वास खेळ पाहायला मिळतोय. ऐकीव, काल्पनिक गोष्टींवर आधारित असलेली रात्रीस खेळ चाले ही झी मराठी वाहिनीवरील मालिका. कोकणातील नाईक कुटुंबावर आधारित असलेली ही मालिका 22 फेब्रुवारी पासून रसिकांच्या भेटीला आली. सुरुवातीला अंधश्रद्धा, भूत अशा कारणांमुळं ही मालिला वादात सापडली. त्यातच काहींना या मालिकेतील कलाकारांची मालवणी भाषा रुचली नाही. तर काहींना मालिकेचं कथानक रटाळवाणं वाटू लागलं. गेल्या तीन महिन्यांत मालिकेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळं ही मालिका आता तिच्या शेवटाकडे वळू लागली असून लवकरच ती रसिकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतील शास्त्रज्ञ असलेली नीलिमा लवकरच नाईक घरातील मंडळींचा भूतप्रेत यावर असलेला पगडा दूर करणार आहे. त्यांच्या मनातील सर्व काल्पनिक गोष्टी नीलिमा दूर करणार आहे. हाच या मालिकेचा शेवट असेल असं सांगितलं जातंय. रात्रीस खेळ चाले मालिकेनं निरोप घेतल्यानंतर पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारी नवी ढंगात, नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येणार असल्याचंही समजतंय.

Web Title: The game will end in the night!