फोटोत दिसणाऱ्या 'या' गोड चिमुकलीला ओळखलं का? मराठी कलाविश्वातील आहे लोकप्रिय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:34 IST2022-04-05T17:33:32+5:302022-04-05T17:34:20+5:30

Anvita phaltankar:सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे.

Do you recognize this cute girl in the photo She is a popular actress in Marathi art world | फोटोत दिसणाऱ्या 'या' गोड चिमुकलीला ओळखलं का? मराठी कलाविश्वातील आहे लोकप्रिय अभिनेत्री

फोटोत दिसणाऱ्या 'या' गोड चिमुकलीला ओळखलं का? मराठी कलाविश्वातील आहे लोकप्रिय अभिनेत्री

सध्याच्या काळात अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे ही सेलिब्रिटी मंडळी अनेकदा त्यांच्या जीवनातील लहानसहान गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यामध्येच मध्यंतरी अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेज जीवनातील फोटो शेअर करत नवा ट्रेंड सुरु केला होता. यामध्येच आता एका लोकप्रिय अभिनेत्रीचा फोटो चर्चेत येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्रीने तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर तिला ओळखणंदेखील कठीण झालं आहे.
या फोटोमध्ये दिसत असलेली चिमुकली अभिनेत्री अन्विता फलटणकर आहे. अन्विताने तिच्या लहानपणीची फोटो शेअर केला आहे. यात तिने केसांचा बॉब कट केला असून ती कोणाच्या तरी मांडीवर बसल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, अन्विताचा हा गोड फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अन्विता अलिकडेच येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत झळकली होती. त्यापूर्वी तिने अनेक मालिका, चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Web Title: Do you recognize this cute girl in the photo She is a popular actress in Marathi art world