"रुम्बा तुम्बा जुम्बा नाही आता फक्त 'ढिंक चिका'" पराभवानंतर ममता बॅनर्जींना अभिनेत्रीचा टोला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 17:35 IST2026-05-06T17:34:18+5:302026-05-06T17:35:06+5:30
भाजपाने पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली आहे.

"रुम्बा तुम्बा जुम्बा नाही आता फक्त 'ढिंक चिका'" पराभवानंतर ममता बॅनर्जींना अभिनेत्रीचा टोला!
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्पष्ट बहुमतासह दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच भाजपाने राज्यातील तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली आहे. या निकालावर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येत आहे. टीव्ही अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी हिनं टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पराभवावर प्रतिक्रिया देत टोला लगावला.
देवोलीना हिनं ट्विटरवर लिहिले, "जर मी कधी एखाद्या राजकारण्याचा तिरस्कार केला असेल तर ती व्यक्ती याच आहेत. आरजी (राहुल गांधी) आणि त्यांच्या टोळीपेक्षा जास्त... खरं तर, मला वाटतं की आरजी (राहुल गांधी) एक चांगला माणूस आहे आणि त्याला विनोदबुद्धीची उत्तम जाण आहे, जी नेहमीच केंद्र सरकारच्या फायद्याची ठरते. एमबी (ममता बॅनर्जी) आणि टोळीला आता निरोप... पश्चिम बंगालमध्ये पुन्हा कधीही दिसणार नाही. बंगालने गेल्या अनेक वर्षांतील सर्वात वाईट स्वप्नाचा सामना केला आहे. आता रुम्बा तुम्बा जुम्बा नाही तर फक्त फक्त 'ढिंक चिका'", असं तिनं म्हटलं.
If i have ever hated a politician thats her. More than RG & gang. 🤣Infact i feel RG is a nice person with a very good humor which helps the centre everytime.
— Devoleena Bhattacharjee (@Devoleena_23) May 4, 2026
MB & Gang TaTa. 😃🤧Never ever see you again in WB. Worst nightmare WB been gone through for so many years. Paltano…
धर्माच्या भिंती ओलांडून केले जिम ट्रेनरशी लग्न
'साथ निभाना साथिया' या मालिकेच्या माध्यमातून देवोलिना ही घराघरात पोहोचली. टेलिव्हिजनवर 'गोपी बहू' म्हणून या नावाने ती आजही चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा भलामोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो. ती आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. राष्ट्रीय मुद्द्यांवर उघडपणे ती भाष्य करताना दिसते. देवोलीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. देवोलीनाने २०२२ मध्ये तिचा जिम ट्रेनर शाहनवाज शेख याच्याशी लग्न केले होतं. ज्यानंतर तिला अनेकदा ट्रोल केले जाते. अलीकडेच तिच्या मुलाच्या त्वचेच्या रंगावरूनही तिला ट्रोल करण्यात आले होते. मात्र, देवोलीना प्रत्येक वेळी ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचे तोंड बंद करत असते.