'ओम शांती ओम' सिनेमातील दीपिका पादुकोणच्या 'रेट्रो' लूकची केली या अभिनेत्रीने कॉपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 15:16 IST2017-01-11T15:16:00+5:302017-01-11T15:16:00+5:30

सिनेमातला ट्रेंड आता टीव्ही मालिकांमध्येही रूळू लागला आहे.अनेका मालिकांतील फेव्हरेट सीन्सशी मिळते जुळेत सीन्स मालिकेत साकारणे, एक्शन सीन्स असे ...

Deepika Padukone's 'Retro Look' in 'Om Shanti Om' movie | 'ओम शांती ओम' सिनेमातील दीपिका पादुकोणच्या 'रेट्रो' लूकची केली या अभिनेत्रीने कॉपी

'ओम शांती ओम' सिनेमातील दीपिका पादुकोणच्या 'रेट्रो' लूकची केली या अभिनेत्रीने कॉपी

नेमातला ट्रेंड आता टीव्ही मालिकांमध्येही रूळू लागला आहे.अनेका मालिकांतील फेव्हरेट सीन्सशी मिळते जुळेत सीन्स मालिकेत साकारणे, एक्शन सीन्स असे अनेक प्रयोग मालिकांमध्ये होतायेत.त्याच धर्तीवर 'हर मर्द को दर्द होता है' नविन मालिकेतले कलाकार रेट्रो लूकमध्ये दिसणार आहेत. यांपूर्वी सिनेमांमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने ‘अ‍ॅक्शन रिप्ले’ सिनेमात,विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’आणि दीपिका पादुकोण ‘ओम शांती ओम’ सिनेमात तर मराठीमध्ये 'अलबेला' आणि दुनियादारी,पोपट अशा काही सिनेमांमध्येही कलाकारांचा ‘रेट्रो’लूक पाहायला मिळाला.



आता ‘हर मर्द का दर्द’ या आगामी विनोदी मालिकेत जेनल बेलानी हिनेही अशाच रिट्रो कपडे परिधान केले आहेत.या मालिकेचे सुरुवातीचे प्रोमो आता प्रसारित होत असून त्यात मालिकेतील कलाकारांनी असे जुन्या फॅशनचे कपडे परिधान केलेले दिसतात. यात तिने एक गुलाबी रंगाचा ड्रेस घातला असून आपले केसही एका बॅण्डमध्ये बांधले आहेत.नायकाच्या भूमिकेतील रशीद फैझलने  प्रिंट असलेला व कॉलरवर बटणे असलेला शर्ट आणि इस्त्री केलेली व प्लीट असलेली पॅन्ट घातल्याचे दिसतंय.या रेट्रो लूकबद्दल जेनल बेलानीकडे विचारणा केली असता तिने सांगितले,“दीपिका पादुकोण ‘ओम शांती ओम’ चित्रपटात असे ‘रिट्रो’ कपडे घातले होते आणि ते तिला शोभूनही दिसले. मी स्वत: दीपिकाची मोठी चाहती आहे.मला जेव्हा असे रेट्रो कपडे घालण्यास सांगण्यात आलं, तेव्हा मला एकदम दीपिकाची आठवण झाली आणि मी तसे कपडे घालण्यास रेडी झाले.”
या समाजातील प्रत्येक पुरुषाला पडणा-या, परंतु त्याचे उत्तर ठाऊक नसल्यामुळे त्याला ज्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यावर या मालिकेत हलकाफुलका कटाक्ष टाकण्यात आला आहे. मालिकेची कथा एका पंजाबी कुटुंबावर केंद्रित असून हे कुटुंब पंजाबातील चौथे मोठे शहर असलेल्या पतियाळामध्ये वास्तव्यास आहे.रशीद फैझल आणि जेनल बेलानी हे या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. मालिकेत फैझलचे नाव विनोद खन्ना असे असून जेनल त्याच्या पत्नीची भूमिका साकारीत आहे.

Web Title: Deepika Padukone's 'Retro Look' in 'Om Shanti Om' movie