Congratulation : करण मेहरा बनला पिता,पत्नी निशाने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 06:43 AM2017-06-15T06:43:51+5:302017-06-15T12:13:51+5:30

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम ​करण मेहराची पत्नी निशा रावाळने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. खुद्द करणेच ...

Congratulation: Karan Mehra became father, wife gave birth to cute baby | Congratulation : करण मेहरा बनला पिता,पत्नी निशाने दिला गोंडस बाळाला जन्म

Congratulation : करण मेहरा बनला पिता,पत्नी निशाने दिला गोंडस बाळाला जन्म

googlenewsNext
'
;ये रिश्ता क्या कहलाता है' फेम ​करण मेहराची पत्नी निशा रावाळने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. खुद्द करणेच त्याच्या चाहत्यांसह ही गुड न्युज शेअर केली आहे. बाळाच्या पायांचा फोटो सोशल मीडियावर टाकत फोटोला त्याने सुंदर अशी कॅप्शनही दिली आहे. ज्या पाहुण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो. त्या पाहुण्याचे येण्याने माझा आनंद आज गगणातही मावेनासा झाला आहे. बाप बनणं काय असतं हे शब्दातही व्यक्त करू शकत नसल्याचे करणने म्हटले आहे. निशा गुड न्यूज देणार असल्याचे कळाल्यापासून करणने प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर अपडेट करत चाहत्यांसह शेअर केली होती. अगदी निशाच्या डोहाळेजेणाचे सेलिब्रेशनचेही फोटो त्याने सोशल मीडियावर अपडेट केले होते.निशा आणि करण हे छोट्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध कपल आहे. करण आणि निशा यांनी सहा वर्षे डेटिंग केल्यानतंर नोव्हेंबर 2012 मध्ये लग्न केले होते.करणने ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत नैतिक बनत रसिकांचे तुफान मनोरंजन केले.ही मालिका सोडल्यानंतर करण बिग बॉसच्या 10व्या पर्वातही कंटेस्टंट म्हणून झळकला होता. त्यानंतर आता करण 'खटमले इश्क' या मालिकेत झळकत आहे. तर निशाही टीव्ही अभिनेत्री आहे. निशाने 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' , 'आने वाला पल' , 'केसर' या मालिकांमध्ये झळकली होती.तर करण आणि निशा रिअॅलिटी शो 'नच बलिए' मध्ये एकत्र झळकले होते. बाळाच्या येण्याने करण काही दिवस शूटिंगमधून ब्रेक घेणार असल्याचे कळतंय. बाळासोबत काही दिवस एन्जॉय करणार असल्यामुळे काही दिवस तरी करण मेहरा छोट्या पडद्यावर झळकणार नसल्याचे समजतंय.

Web Title: Congratulation: Karan Mehra became father, wife gave birth to cute baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.