बिग बॉस : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घरात अवतरले तीन शोंचे स्टार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 19:39 IST2016-12-31T19:37:09+5:302016-12-31T19:39:19+5:30

बिग बॉसच्या घरातील सदस्यांना नव्या वर्षाच्या स्वागताची रात्र जल्लोषमय वातावरणात व्यतित करता यावी याकरिता बिग बॉसने कलर्सच्या तब्बल तीन ...

Bigg Boss: The three stars starring in the house for the new year's reception | बिग बॉस : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घरात अवतरले तीन शोंचे स्टार्स

बिग बॉस : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घरात अवतरले तीन शोंचे स्टार्स

ग बॉसच्या घरातील सदस्यांना नव्या वर्षाच्या स्वागताची रात्र जल्लोषमय वातावरणात व्यतित करता यावी याकरिता बिग बॉसने कलर्सच्या तब्बल तीन शोंच्या कलाकारांना घराच्या व्यासपीठावर निमंत्रित करून एक अविस्मरणीय रात्रीची अनुभूती दिली. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच तीन शोंचे कलाकार एकाच वेळी बिग बॉस शोच्या व्यासपीठावर एकत्र आले. शिवाय धमाकेदार परफॉर्मन्सनी घरातील तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदतही केली. 

.@beingsalmankhan welcomes 2017 with his rocking performance, tonight on #BB10NewYearKaVaar! Don't miss! #videopic.twitter.com/U9mVQ0SngA— Bigg Boss (@BiggBoss) December 31, 2016 ">http://

}}}}
‘झलक दिखला जा, कॉमेडी नाइट्स बचाओ आणि बिग बॉस’ या तीन शोंच्या कलाकारांनी ‘न्यू इयर’च्या रात्रीत चार चॉँद लावले. अर्थातच यामध्ये सर्वांत हटके आणि आकर्षक एंट्री ही बिग बॉसचा होस्ट सलमान खान याची ठरली. सलमानच्या ‘वीकेण्ड का वॉर’ या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांच्या आठवडाभराच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो, परंतु यावेळचा एपिसोड हा मनोरंजनाचा फुल टू धमाका ठरला. 

.@karishma_tanna raises the hotness & entertainment quotient with her performance on #BB10NewYearKaVaar! pic.twitter.com/T6ZwQUkmp3— Bigg Boss (@BiggBoss) December 31, 2016 ">http://

}}}}
या एपिसोडमध्ये कॉमेडी कलाकारांसह डान्स शोच्या कलाकारांनी एकच धमाल केली. सलमान युसूफ खान, करिष्मा तन्ना, शंतनू माहेश्वरी आणि स्वाती नित्या डान्स परफॉर्म करताना बघावयास मिळाले, तर सलमान खाननेही परफॉर्म करीत न्यू इयर नाइटमध्ये रंगत आणली. तर कृष्णा अभिषेक, भारती सिंह, मुबीन, अनिता हस्सनंदानी, करन वाही, सुदेश लहरी आणि अदिती भाटिया यांनी कॉमेडीचा असा काही तडका लावला की, सर्वच दंग राहिले. 

The super stunning @karishma_tanna to entertain you tonight on #BB10NewYearKaVaar, 9PM! Here's a glimpse! #ManveerGurjar#ManuPunjabi#Videopic.twitter.com/CTBj3PVQ0p— COLORS (@ColorsTV) December 31, 2016 ">http://

}}}}
एवढेच नाही तर यावेळी ‘बडा भुक्खड, जानी दुश्मन, फुटेज खाऊ, खानो की खुनी’ यांसारखे अवॉडर्सदेखील सलमानच्या हस्ते घरातील सदस्यांना वितरीत करण्यात आले. अतिशय रंगारंग कार्यक्रमात पार पडलेल्या या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांनीदेखील जबरदस्त धमाल केली. विशेषत: मनू आणि मनवीर यांनी डान्सचा तडका लावत एन्जॉय केला. 

From #JDJ9, @SalmanYKhan sets the stage of #BB10NewYearKaVaar on fire, as he taps his feet with all the pretty ladies! pic.twitter.com/bmEQ0lbKW8— Bigg Boss (@BiggBoss) December 31, 2016 ">http://

}}}}

Web Title: Bigg Boss: The three stars starring in the house for the new year's reception