बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 13:25 IST2026-01-26T13:25:23+5:302026-01-26T13:25:49+5:30

वाईल्ड कार्ड एन्ट्री की आणखी काही? बिग बॉसच्या घरात कोण येणार?

bigg boss marathi season 6 new promo first wild card entry in the house | बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल

बिग बॉस मराठी ६: तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्री? सर्व सदस्य चकित; प्रोमो व्हायरल

'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये सध्या धमाल सुरु आहे. कालच या सीझनचं पहिलं एलिमिनेशन पार पडलं. राधा पाटील घरातून बाहेर आली. तिच्या एलिमिनेशनने घरातील अनेकांना धक्का बसला. करण, अनुश्री यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान आता कलर्सने नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये बिग बॉसच्या घरात पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होत असल्याचा हा प्रोमो आहे.

नवीन प्रोमोमध्ये सर्व घरातील सदस्य लिव्हिंग एरियामध्ये बसलेले असतात. तेव्हाच बिग बॉस जाहीर करतात की आता येत आहे बिग बॉस मराठी सीझन ६ चे पहिले वाईल्ड कार्ड सदस्य ...तेव्हाच दरवाजा उघडतो. सर्व सदस्य  आश्चर्य व्यक्त करतात. आता हा वाईल्ड कार्ड नक्की कोण असणार हे आजच्या भागात कळणार आहे.


११ जानेवारी रोजी बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाला सुरुवात झाली. एकूण १७ सदस्यांनी घरात प्रवेश घेतला. तर कालच एक सदस्य म्हणजे राधा पाटील एलिमिनेट झाली दरम्यान आता या पर्वाच्या तिसऱ्या आठवड्यातच वाईल्ड कार्ड एन्ट्रीची घोषणा झाल्याने सगळे आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच हा सदस्य नक्की कोण असेल याचेही तर्क लावले जात आहेत. दरम्यान हा नक्की वाईल्ड कार्डच असेल की बिग बॉसचा काही ट्विस्ट याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Web Title : बिग बॉस मराठी 6: तीसरे हफ्ते में वाइल्ड कार्ड एंट्री!

Web Summary : बिग बॉस मराठी 6 में पहले एलिमिनेशन और तीसरे हफ्ते में वाइल्ड कार्ड एंट्री की घोषणा से प्रतियोगी हैरान हैं।

Web Title : Bigg Boss Marathi 6: Wild Card Entry in Third Week!

Web Summary : Bigg Boss Marathi 6 sees its first elimination and a surprise wild card entry announcement in just the third week, shocking contestants.