भूषण वैतागला फेकबुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2016 10:53 IST2016-05-16T05:23:17+5:302016-05-16T10:53:17+5:30

अभिनेता भूषण प्रधानच्या नावाने फेसबुकला एक खोटे अकाऊंट तयार करण्यात आले आहे. हे अकाऊंट पाहिल्यावर हे खरेच भूषणचे अकाऊंट ...

Bhushan Vitagala Fekabuka | भूषण वैतागला फेकबुकला

भूषण वैतागला फेकबुकला

िनेता भूषण प्रधानच्या नावाने फेसबुकला एक खोटे अकाऊंट तयार करण्यात आले आहे. हे अकाऊंट पाहिल्यावर हे खरेच भूषणचे अकाऊंट आहे असेच वाटते. कारण यात भूषणविषयी सगळी माहिती, त्याचे फोटो आहेत. भूषणला या अकाऊंटविषयी काही महिन्यांपूर्वी कळले होते. त्याने या अकाऊंटविषयी तक्रारही दाखल केली आहे. पण अद्याप त्यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. या अकाऊंटवर भूषणचा वाढदिवस १५ मे असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण दिवसभर भूषणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱयांचे फोन आणि संदेश येत होते. आज माझा वाढदिवस नाहीये हे सगळ्यांना सांगून भूषण अक्षरशः कंटाळला होता. फेसबुकच्या या फेक अकाऊंटमुळे भूषणाला चांगलाच मनस्ताप झाला असल्याचे भूषण सांगतो.

Web Title: Bhushan Vitagala Fekabuka