इस प्यार को क्या नाम दूँ 3 मध्ये बरुण सोबती प्रमुख भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 16:42 IST2017-05-02T11:12:15+5:302017-05-02T16:42:15+5:30

इस प्यार को क्या नाम दूँ ही मालिका प्रंचड गाजली होती. या मालिकेतील वरुण सोबती आणि सान्या इराणी यांची ...

Barun Sobti plays a key role in the name of this love | इस प्यार को क्या नाम दूँ 3 मध्ये बरुण सोबती प्रमुख भूमिकेत

इस प्यार को क्या नाम दूँ 3 मध्ये बरुण सोबती प्रमुख भूमिकेत

प्यार को क्या नाम दूँ ही मालिका प्रंचड गाजली होती. या मालिकेतील वरुण सोबती आणि सान्या इराणी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. आज ही मालिका संपून अनेक वर्षं झाली असली तरी त्या दोघांच्या केमिस्ट्रीची अनेक वेळा चर्चा रंगते. या मालिकेच्या यशामुळे इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता. पण दुसऱ्या सिझनमध्ये प्रेक्षकांना सान्या इराणी आणि वरुण सोबती यांची जोडी पाहायला मिळाली नसल्याने त्यांची निराशा झाली होती. त्यांची जागा शरेणू पारेख आणि अविनाश सचदेव यांनी घेतली होती. पण या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना रुचली नसल्याने या मालिकेने प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेतला. 
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेच्या दुसऱ्या सिझनला मिळालेल्या अपयशामुळे या मालिकेची निर्माती गुल खानने चांगलाच धडा घेतला आहे आणि त्यामुळे तिसऱ्या सिझनमध्ये तिने प्रेक्षकांच्या लाडक्या बरुण सोबतीला परत आणले आहे. इस प्यार को क्या नाम दूँ या कार्यक्रमात बरुण सोबती नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी प्रेक्षकांना कळल्यापासून बरुणचे फॅन्स चांगलेच खूश आहेत. गुलने इन्स्टाग्रामवर या मालिकेचा छोटासा टिजर पोस्ट करून या मालिकेत बरुण असल्याचे लोकांना सांगितले आहे. 
पण या मालिकेत बरुणची जोडी सान्यासोबत नाही तर दुसऱ्याच एका अभिनेत्रीसोबत जमणार आहे. शिवानी तोमर या मालिकेत बरुणच्या नायिकेच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. तिने ही मालिका साइनदेखील केल्याची चर्चा आहे. शिवानीने याआधी कसम तेरे प्यार की या मालिकेत काम केले होते.
इस प्यार को क्या नाम दूँ या मालिकेचे चित्रीकरण पुढील महिन्यात सुरू होणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेत बरुण अद्व्य सिंग रायजादा ही भूमिका साकारणार आहे. 

Web Title: Barun Sobti plays a key role in the name of this love