​‘बहू हमारी रजनी कांत’ नव्या वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2016 13:31 IST2016-09-15T07:59:12+5:302016-09-15T13:31:16+5:30

‘बहू हमारी रजनीकांत मालिकेत नेहमीच त्यांच्या टेक्नोसॅव्ही कॉमेडी अंदाजात रसिकांचं मनोरंजन करण्यात येत असून ही मालिका नव्या वळणावर पोहचलीय. ...

'Bahu our rajni kant' on new turn | ​‘बहू हमारी रजनी कांत’ नव्या वळणावर

​‘बहू हमारी रजनी कांत’ नव्या वळणावर

हू हमारी रजनीकांत मालिकेत नेहमीच त्यांच्या टेक्नोसॅव्ही कॉमेडी अंदाजात रसिकांचं मनोरंजन करण्यात येत असून ही मालिका नव्या वळणावर पोहचलीय. आता मालिकेतील अमर्त्य मामा (सुमित कौल) आणि बबल्स बुआ (स्वीटी वालिया) या जुन्या पिढीच्या व्यक्तिरेखांमध्ये प्रेमांकुर फुलून येतायत. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडालेत की चक्क ते निळे पडलेत. मालिका म्हटलं की काही होऊ शकतं. आगामी भागात अमर्त्यला आपल्या सूनबाईवर संशय येतो. ती परग्रहावरील जीव असल्याचं त्याला वाटू लागतं. त्यामुळं तो तिला एक पेय देतो ज्यामुळं तिची कांती निळी पडते. रजनी हे द्रव्य प्राशन करते. मात्र तिच्यावर काहीही परिणाम होत नाही. यामुळं मामा आणि बुआ यांच्यात जोरदार खडाजंगी होते. त्यावेळी आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी मामा स्वतः ते पेय प्राशन करतो. त्यामुळं त्याचं संपूर्ण शरीर निळंशार पडतं. बुआही मामाप्रमाणेच ते पेय प्राशन करते त्यामुळं तिचीही त्वचा निळीशार पडते. 

Web Title: 'Bahu our rajni kant' on new turn