'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 12:40 IST2023-07-04T12:40:31+5:302023-07-04T12:40:55+5:30

Rohit Parshuram : रोहित परशुराम आणि पत्नी पूजा यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही बातमी कळताच दोघांवर सेलिब्रिटींकडून आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

'Appi Amchi Collector' serial actor became father | 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील अभिनेत्याला कन्यारत्न प्राप्त

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अप्पी आमची कलेक्टर (Appi Aamchi Collector)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत अर्जुनची प्रमुख भूमिका अभिनेता रोहित परशुराम (Rohit Parshuram) साकारत आहे. या मालिकेतून रोहित घराघरात पोहचला आहे. दरम्यान रोहितने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. रोहित परशुराम आणि पत्नी पूजा यांना कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. ही बातमी कळताच दोघांवर सेलिब्रिटींकडून आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 काही महिन्यांपूर्वी रोहित परशुराम याने पत्नी पूजाचे डोहाळजेवण थाटात केले होते. त्यावर सेलिब्रिटींनी आणि रसिक प्रेक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला होता. त्यानंतर  शनिवारी म्हणजेच १ जुलै २०२३ रोजी या दाम्पत्यास कन्यारत्न प्राप्त झाल्याचे समोर आले. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, रुई. पुन्हा एकदा शनिवारी मारुतीरायाने आशिर्वाद दिला पण ह्यावेळी आयुष्यातला सगळ्यांत मोठा आणि गोड !! शनिवारी तिन्हीसांजेला मुलगी झाली !! रुई....मारुतीरायाला अर्पण !

रोहितची पत्नी पूजा ही देखील मॉडेल आहे. अनेक सौंदर्य स्पर्धेत पूजाने सहभाग दर्शवला होता. यातूनच काही स्पर्धांसाठी तिला बक्षिसं देखील मिळालेली आहेत. रोहित परशुराम हा अभिनय क्षेत्रात येण्याअगोदर शरीर सौष्ठव म्हणून नाव लौकिक करत होता. पण मित्राच्या सल्ल्याने त्याने मिथुन चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. तेव्हा या चित्रपटात त्याला विरोधी भूमिकेत झळकण्याची संधी मिळाली. खरं तर शरीरसौष्ठव म्हणून नाव लौकिक मिळणाऱ्या रोहितचे वजन या भूमिकेसाठी खूपच जास्त होते. पण मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर अवघ्या काही दिवसात त्याने आपले वजन घटवले होते.

मिथुन चित्रपटानंतर रोहित हिंदी मालिकांमध्येही झळकला. क्रिमीनल्स, ज्ञानेश्वर माऊली, फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमधून त्याला छोट्या, मोठ्या भूमिका मिळत होत्या. मात्र अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून त्याला खरी लोकप्रियता मिळाली आहे.

Web Title: 'Appi Amchi Collector' serial actor became father