आॅनस्क्रीन लग्नात दृष्टी नेसणार स्वत:च्या लग्नातील साडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 19:40 IST2016-11-24T19:40:12+5:302016-11-24T19:40:12+5:30

‘परदेस मे है मेरा दिल’ या रोमॅँटिक मालिकेत नैना बत्राची भूमिका साकारत असलेली दृष्टी धामी सध्या चांगलीच उत्साहात आहे. ...

AnScreen will take a look at their own wedding sarees | आॅनस्क्रीन लग्नात दृष्टी नेसणार स्वत:च्या लग्नातील साडी

आॅनस्क्रीन लग्नात दृष्टी नेसणार स्वत:च्या लग्नातील साडी

रदेस मे है मेरा दिल’ या रोमॅँटिक मालिकेत नैना बत्राची भूमिका साकारत असलेली दृष्टी धामी सध्या चांगलीच उत्साहात आहे. याची प्रचिती तेव्हा आली जेव्हा मालिकेत विवाहाचा एक प्रसंग चित्रित करायचा होता. या प्रसंगासाठी तिने डिझायनरकडचा पोशाख परिधान न करता स्वत:चा लग्नातील पोशाख परिधान करून सीन पूर्ण केला. 

याबाबत दृष्टीने सांगितले की, मला भारतीय पारंपारिक कपडे नेसायला आवडतात. मला जेव्हा निर्मात्यांनी लग्नाचा प्रसंग चित्रित करण्यासाठी खास पोशाख शिवण्यासाठी डिझायनरकडे जाण्याचा सल्ला दिला, तेव्हा माझ्या लग्नात वापरलेली भरजरी साडी नेसायला मला आवडेल, असे निर्मात्यांना सुचविले. त्यांनाही ही कल्पना आवडली अन् त्यांनी लगेचच होकार दिला. 

दृष्टीचा हा उत्साह मालिकेतील इतर कलाकारांसाठी कौतुकाचा विषय ठरला. सध्या दृष्टी आणि अर्जुन बिजलानी यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, हे युगल मालिकेत लग्नाच्या बंधनात कधी अडकणार यांची उत्सुकता लागली आहे. 


Web Title: AnScreen will take a look at their own wedding sarees