"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:30 IST2025-06-11T12:29:04+5:302025-06-11T12:30:30+5:30

सोशल मीडियावर चाहतीनं अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?" असा प्रश्न विचारला.

Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu | "तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

"तोच पती सात जन्म मिळतो हे पटतं तुला?" वटपौर्णिमेवरुन चाहतीचा सवाल, अंकिता म्हणाली "मी हिंदू"

Vat Paurnima 2025: ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वट सावित्री व्रत केले जाते. आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यवती हे व्रत करतात. काल सर्वत्र वटपौर्णिमेचा सण साजरा झाला. अनेक अभिनेत्रीही वटसावित्रीचं व्रत करत वटपौर्णिमा साजरी केली. 'कोकण हार्टेड गर्ल' आणि 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकर हिची लग्नानंतरची ही पहिलीच वटपौर्णिमा होती. अंकिताने नवऱ्यासोबत वटपौर्णिमेचा सण साजरी केली. याचे फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले. मात्र, तिच्या एका चाहतीला अंकिताचं वटपौर्णिमा साजरी करणं पटलं नाही. सोशल मीडियावर तिनं थेट अंकिताला "तोच पती सात जन्मांसाठी मिळतो, हे तुला खरंच पटतं का?"  असा प्रश्न विचारला. यावर अंकितानं अगदी ठामपणे उत्तर दिलंय. तिचं हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आलं आहे.

अंकितानं वटपौर्णिमा साजरी करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यावर एका चाहतीनं कमेंट करत तिला विचारलं की, "या सगळ्या गोष्टीवर अंकिता तुझा खरंच विश्वास आहे का?  नटण्यासाठी आणि दाखवण्यासाठी हे सगळं ठिक आहे. वडाला फेऱ्या मारुन तोच पती सात जन्म मिळतो, हे पटतं का तुला? तुझ्या मी सगळ्या पोस्ट पाहते, व्हिडीओ पाहते. त्यामधून तुला ओळखते तेवढं.. तू हे सगळं करतेस? असो... तुला किंवा इतरांना मला दुखवायचं नाही. खूप छान मेकअप आणि लूक", असं तिनं म्हटलं. 

चाहतीच्या प्रश्नावर उत्तर देत अंकिता म्हणाली, "वटवृक्ष हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो. मी हिंदू आहे. हे व्रत स्त्रिया आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्य आणि सुखी दाम्पत्य जीवनासाठी करतात. त्यासाठी मला हे आयुष्यभर करायला आवडेल. सात जन्माचं मला माहित नाही. पण हे व्रत सावित्रीच्या दृढ निश्चयाचं प्रतिक आहे. जिने आपल्या पतीचे प्राण यमदेवाकडून परत मिळवले होते. माझं माझ्या नवऱ्यासाठी असलेलं प्रेम आणि माझ्या परंपरांवर असलेलं प्रेम यासाठी मी हे आयुष्यभर करत राहीन. आमच्या लग्नासाठीही आमचा दृढ निश्चय कामी आला होता", या  सोप्या शब्दांत अंकितानं चाहतीला उत्तर दिलं. 

Web Title: Ankita Walwalkar Celebrated Vat Paurnima 2025 But Female Fan's question Kokan Hearted Girl Says I am Hindu