​अयातने दिली द व्हॉइज इंडियाच्या सेटला सरप्राईज भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:09 IST2017-01-06T17:09:02+5:302017-01-06T17:09:02+5:30

द व्हॉइज इंडिया किड्सच्या गेल्या सिझनमधील स्पर्धक अयात ही सगळ्यांचीच लाडकी बनली होती. तिने या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्यावेळी उन से ...

Aiyar gave a surprise visit to the set of The Voice India | ​अयातने दिली द व्हॉइज इंडियाच्या सेटला सरप्राईज भेट

​अयातने दिली द व्हॉइज इंडियाच्या सेटला सरप्राईज भेट

व्हॉइज इंडिया किड्सच्या गेल्या सिझनमधील स्पर्धक अयात ही सगळ्यांचीच लाडकी बनली होती. तिने या कार्यक्रमाच्या ऑडिशनच्यावेळी उन से मिली नजर हे गाणे गायले होते. या गाण्याने तिने शेखर, शान आणि नीती मोहन या तिन्ही परीक्षकांचे मन जिंकले होते. तिच्या आवाजामुळे या तिघांनीही तिच्या निवडीला संमती दिली होती.
द व्हॉइज इंडिया किड्सच्या प्रत्येक भागात रसिकांना तिने गायलेली एकापेक्षा एक सुंदर गाणी ऐकायला मिळाली. या कार्यक्रमाचे तिला विजेतेपद मिळवता आले नसले तरी या कार्यक्रमाने तिला प्रचंड फॅन फॉलॉविंग मिळवून दिली आहे. द व्हॉइज इंडिया किड्स या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आणि आता द व्हाइज इंडिया हे या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले आहे. या कार्यक्रमालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाच्या सेटवर नुकतेच सगळ्यांना एक खूप छान सरप्राईज मिळाले.
द व्हॉइज इंडिया किड्स या कार्यक्रमातील अयात अचानक या कार्यक्रमाच्या सेटवर आली. तिला पाहून सेटवरील सगळेच प्रचंड खूश झाले. नीती मोहन तर तिला पाहून प्रचंड खूश झाली होती. आपल्या लाडक्या अयातला इतक्या दिवसांनी भेटल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. याविषयी नीती सांगते, "अयात तिच्या आई आणि बहिणीसोबत आमच्या कार्यक्रमाच्या सेटवर आली होती. आयतसोबतचे माझे नाते खूपच वेगळे आहे. तिला पाहून मी खूप आनंदित झाले होते. सलीम आणि बेनी हे द व्हॉइज इंडिया किड्स या कार्यक्रमाचे भाग नव्हते. पण तरीही त्यांना अयातविषयी चांगलीच माहिती आहे. ते दोघेही तिला भेटून खूप खूश झाले होते." 


Web Title: Aiyar gave a surprise visit to the set of The Voice India