"लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

By कोमल खांबे | Updated: May 9, 2026 13:38 IST2026-05-09T13:37:51+5:302026-05-09T13:38:31+5:30

ऐश्वर्या नारकर यांनी देखील 'लाल लाल कलरची बांगडी' गाण्यावर रील बनवला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. 

aishwarya narkar dance on laal kalarchi bangdi song sanju rathod commented | "लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

"लाल लाल कलरची बांगडी..." गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी बनवला रील, संजू राठोड कमेंट करत म्हणाला...

सोशल मीडियावरील गाण्यांचा ट्रेंड रोज बदलत असतो. सध्या संजू राठोडच्या 'लाल लाल कलरची बांगडी' या गाण्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या गाण्यावरील रील्स सध्या व्हायरल होत आहेत. सेलिब्रिटींनाही या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरता येत नाहीये. ऐश्वर्या नारकर यांनी देखील 'लाल लाल कलरची बांगडी' गाण्यावर रील बनवला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. 

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. 'लाल लाल कलरची बांगडी' गाण्यावर त्या डान्स करताना दिसत आहे. 'लाल लाल कलरची बांगडी' या गाण्याच्या हुक स्टेप्सही त्यांनी केल्या आहेत. साडी नेसून हातात लाल रंगाच्या बांगड्या त्यांनी घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओवर संजू राठोडनेही कमेंट केली आहे. "सुंदर" अशी कमेंट संजू राठोडने ऐश्वर्या नारकर यांच्या व्हिडीओवर केली आहे. 


ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेली कित्येक वर्ष त्या प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहेत. सोशल मीडियावरही त्या प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. ट्रेंडिंग गाण्यावरील रील व्हिडीओ त्या बनवत असतात. त्यांच्यासोबत अविनाश नारकरही अनेकदा रील बनवतात. 

Web Title : 'लाल लाल' गाने पर ऐश्वर्या नारकर का रील वायरल, संजू ने की टिप्पणी

Web Summary : ऐश्वर्या नारकर ने संजू राठौड़ के लोकप्रिय गाने 'लाल लाल कलरची बांगड़ी' पर एक रील बनाई। लाल चूड़ियों के साथ साड़ी में ऐश्वर्या के नृत्य वाले वीडियो को प्रशंसकों से सराहना मिली, जिसमें स्वयं संजू राठौड़ की 'सुंदर' टिप्पणी भी शामिल है। ऐश्वर्या सोशल मीडिया पर सक्रिय रहने के लिए जानी जाती हैं।

Web Title : Aishwarya Narkar's reel on 'Laal Laal Bangdi' song goes viral.

Web Summary : Aishwarya Narkar created a reel on Sanju Rathod's popular song, 'Laal Laal Colorchi Bangdi'. The video, featuring Aishwarya dancing in a saree with red bangles, received appreciation from fans, including a 'beautiful' comment from Sanju Rathod himself. Aishwarya is known for her active social media presence.