बिग बॉसनंतर सलमान खान पुन्हा एकदा दिसणार छोट्या पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 16:09 IST2018-02-08T10:39:54+5:302018-02-08T16:09:54+5:30

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान टीव्हीवरचा सगळ्यात जास्त पॉप्युलर होस्टपैकी एक आहे. बिग बॉसनंतर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरच परतणार ...

After Bigg Boss, Salman Khan will appear once again on small screens | बिग बॉसनंतर सलमान खान पुन्हा एकदा दिसणार छोट्या पडद्यावर

बिग बॉसनंतर सलमान खान पुन्हा एकदा दिसणार छोट्या पडद्यावर

लिवूडचा सुपरस्टार सलमान खान टीव्हीवरचा सगळ्यात जास्त पॉप्युलर होस्टपैकी एक आहे. बिग बॉसनंतर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावरच परतणार आहे. लवकरच तो '10 का दम' हा टीव्ही शोचे तिसरे सीजन होस्ट करणार आहे. या आधीचे दोन सीझनचा होस्टसुद्धा सलमान खान होता.  आधी हा शो जून 2018मध्ये येणार असल्याची चर्चा होती मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हा शो जूनच्या आधीच लाँच होणार आहे.  मीडिया रिपोर्टनुसार 9 फेब्रुवारीला या शोचे प्रोमो शूट सलमान खान करणार आहे. पहिल्या प्रोमो शूटसोबतच शोच्या ऑडिशनचे देखील करणार आहेत. '10 का दम' हा इंटरनॅशनल रिऑलिटी गेम शो 'पॉवर ऑफ 10' चे हिंदी व्हर्जन आहे. गेममध्ये सहभागी होणार स्पर्धक 10 कोटींपर्यंतची रक्कम जिंकू शकते.  

ALSO READ :   तुम्हाला हे माहिती आहे का ?, लवरात्रिसाठी सलमान खानची पहिली पसंती होती ही अभिनेत्री

सध्या सलमान खान 'रेस 3' आणि 'भारत'ला घेऊन चर्चेत आहे. नुकतेच सलमानने 'रेस 3'च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल मुंबईत पूर्ण केले आहे. 'रेस 3' मध्ये सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. हा चित्रपट 15 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'रेस 3' मध्ये बॉबी देओल आणि डेजी शाहची देखील महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपट भारत बद्दल बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करतो आहे.  अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. सध्या या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे.  यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. तसेच  सलमान खानचे 'किक 2' 2019च्या ख्रिसमसला रिलीज होणार आहे.साजिद नाडियाडवालाने 'किक 2'ची घोषणा केली आहे. 

Web Title: After Bigg Boss, Salman Khan will appear once again on small screens