आता मुलगी हवी! हातात बाहुली घेऊन अभिनेत्रीने केलेल्या डोहाळेजेवणाची चर्चा, ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 11:47 IST2026-05-11T11:44:37+5:302026-05-11T11:47:57+5:30
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पूजा आणि तिचे कुटुंब सध्या प्रचंड उत्साहात असून तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

आता मुलगी हवी! हातात बाहुली घेऊन अभिनेत्रीने केलेल्या डोहाळेजेवणाची चर्चा, ३९ व्या वर्षी दुसऱ्यांदा होणार आई
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बॅनर्जी लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. आपल्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पूजा आणि तिचे कुटुंब सध्या प्रचंड उत्साहात असून तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला पूजा, तिचा पती कुणाल आणि नातेवाईक उपस्थित होते.
पूजा बॅनर्जीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "आज माझं डोहाळेजेवण आहे." या खास प्रसंगी तिने आपल्या चाहत्यांकडून आशीर्वाद आणि प्रेम मागितले आहे. तिचे चाहते आणि मित्रमंडळी कमेंट्सच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण डोहाळेजेवणात तिच्या हातात छोटीशी बाहुली होती. त्यामुळे अभिनेत्रीने मुलगी व्हावी ही इच्छा व्यक्त केलेली दिसते.
दुसऱ्या बाळाची उत्सुकता
काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्लॉग शेअर करून ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची आनंदाची बातमी दिली होती. तिने पती आणि अभिनेता कुणाल वर्माला हे सरप्राइज दिले, तेव्हा तो भावुक झाला आणि त्याने पूजाला मिठी मारली होती.
पूजा आणि कुणाल यांची पहिली भेट 'तुझ संग प्रीत लगाई सजना' या मालिकेच्या सेटवर झाली होती. १५ एप्रिल २०२० रोजी लॉकडाऊन दरम्यान त्यांनी कोर्ट मॅरेज केले होते. त्यानंतर, पहिल्या मुलाच्या जन्मानंतर १५ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी गोव्यात बंगाली रितीरिवाजांनुसार पुन्हा एकदा मोठ्या थाटात लग्न केले. कुणालसोबत लग्न करण्यापूर्वी पूजाचे पहिले लग्न २००४ मध्ये अरुणॉय चक्रवर्तीसोबत झाले होते, मात्र २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
पूजा बॅनर्जीची कारकीर्द
पूजा बॅनर्जीने २००८ मध्ये आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती. तिने 'देवों के देव महादेव' (पार्वतीच्या भूमिकेत), 'सर्वगुण संपन्न', 'कुबूल है' आणि 'कॉमेडी नाईट्स बचाओ' यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले आहे. टीव्ही मालिकांशिवाय तिने २०११ मध्ये 'वडेलुडू' या तेलुगू चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि अनेक बंगाली चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.