प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 05:15 PM2023-10-10T17:15:14+5:302023-10-10T17:15:33+5:30

'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा'मध्ये आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती.

aastad kale talk about phase after his pheouncy death said swapnali patil help me to tackkle with situation | प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..."

प्रेयसीच्या निधनानंतर आस्ताद काळेची झालेली 'अशी' अवस्था, म्हणाला, "त्या काळात स्वप्नालीने मला..."

आपल्या आवडत्या कलाकारांचे किस्से, लव्ह स्टोरी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना रस असतो. 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या सीरिजमधून कलाकारांच्या लव्हस्टोरी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. मराठी कलाकार आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी हजेरी लावली होती. स्वप्नाली आणि आस्तादची पहिली भेट 'पुढचं पाऊल' मालिकेच्या सेटवर झाली होती. 

स्वप्नालीची आयुष्यात एन्ट्री होण्याआधी आस्तादच्या प्रेयसीचं निधन झालं होतं. त्यामुळे त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. पण, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी स्वप्नालीने त्याला मदत केल्याचं आस्तादने या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाला, "मालिकेत स्वप्नालीची एन्ट्री होण्याआधीच कॅन्सरमुळे फेब्रुवारी माझ्या प्रेयसीचं निधन झालं होतं. त्यानंतर मार्च, एप्रिलच्या सुमारास स्वप्नालीची पुढचं पाऊलमध्ये एन्ट्री झाली. मे महिन्याच्या शेवटपर्यंत ही मुलगी मला आवडते, हे जाणवायला लागलं होतं. त्यावेळी तिने मला तू वेळ घे, असं सांगितलं होतं. तुला नुकताच भावनिक धक्का बसला आहे. आता ज्या तू स्टेजमधून जात आहेस. त्यासाठी तू जर माझ्यात आधार शोधत असशील, तर मी तो आता देऊ शकणार नाही, असं तिने मला स्पष्ट सांगितलं होतं. आणि या गोष्टीची मला तेव्हा खूप मदत झाली होती." 

"कारण प्रेयसीच्या निधनानंतर मी खूप वेड्यासारखा वागत होतो. सेटवरही मी अनेकदा माती खाल्ली आहे. मी बेशिस्त पद्धतीने वागायचो. त्यावेळेस तिने मला तीन-चार वेळा मैत्रीण म्हणून हे तुझं चुकतंय असं सुनावलं होतं. तिने मला आधार देण्यापेक्षा या गोष्टीचा मला खूप जास्त फायदा झाला. यासाठी मी तिचा आयुष्यभर ऋणी राहीन. त्या फेजमधून तिने मला बाहेर काढलं. माझी प्रेयसी आणि मी जिथे राहत होतो, त्याच घरात मी तिच्या निधनानंतरही राहत होतो. त्यामुळे दार उघडलं की मला ते घर खायला उठायचं. अशा फेजमधून तिने मला बाहेर काढलं," असंही आस्तादने सांगितलं. 

आस्ताद आणि स्वप्नालीने व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर १४ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाआधी दीड वर्ष आस्ताद आणि स्वप्नाली लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. सोशल मीडियावर अनेकदा आस्ताद स्वप्नालीबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करत असतो. 

Web Title: aastad kale talk about phase after his pheouncy death said swapnali patil help me to tackkle with situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.