Aastad Kale :  त्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा..., आस्ताद काळेचा इशारा नेमका कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 11:24 IST2022-09-12T11:16:23+5:302022-09-12T11:24:13+5:30

Aastad Kale : पोस्टमध्ये आस्तादने झी मराठी वाहिनीवरच्या एका मालिकेतील कलाकाराला हळूच चिमटा काढला आहे. हा कलाकार कोण? हे मात्र तुम्ही ओळखायचं आहे हं...!

aastad kale share post talk about zee marathi tv serial viral | Aastad Kale :  त्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा..., आस्ताद काळेचा इशारा नेमका कुणाकडे?

Aastad Kale :  त्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा..., आस्ताद काळेचा इशारा नेमका कुणाकडे?

मराठमोळा अभिनेता आस्ताद काळेची (Aastad Kale) एक पोस्ट  सध्या चांगलीच व्हायरल होतेय आणि कमेंट्स तर विचारू नका. आस्तादच्या या पोस्टवर चाहत्यांनी भारी कमेंट्स केल्या आहेत. आस्तादच्या पोस्ट तशाही भारी असतात. कधी हळूच टोमणा, कधी उपरोधिक शेरा अशा त्याच्या पोस्ट क्षणात व्हायरल होतात. आत्ताची त्याची ताजी पोस्टही तशीच. या पोस्टमध्ये आस्तादने झी मराठी वाहिनीवरच्या एका मालिकेतील कलाकाराला हळूच चिमटा काढला आहे. हा कलाकार कोण? हे मात्र तुम्ही ओळखायचं आहे हं! अर्थात आस्तादच्या पोस्ट खालच्या कमेंट्स वाचल्यावर तुम्हालाही आस्ताद कुणाबद्दल बोलतोय, त्याचा अंदाज येईलच.

 आस्तादची पोस्ट
 आस्तादने एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.   ‘झी मराठीवरील एका मालिकेतील त्या एका नटानी साकारलेल्या पात्राच्या वाक्यांपुरती सबटायटल्सची सोय करा बुवा. काय बोलतो कळत नाही....’, असं आस्तादने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. शिवाय,  मी ती मालिका बघत नाही. काल माझ्या आईनी लावली होती, तेव्हा तीमधले एक-दोन प्रसंग भोगले, असंही त्याने सरतेशेवटी लिहिलं आहे.  

आस्तादने आपल्या या पोस्टमध्ये कोणत्याही मालिकेचा वा अभिनेत्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. पण नेटकऱ्यांना मात्र त्याचा इशारा नेमका समजला आहे. काहींनी, ही मालिका कोणती, तो अभिनेता कोणता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण काहींनी थेट आस्तादचा इशारा कुणाकडे? याचं उत्तर कमेंट्समध्ये दिलं आहे. या कमेंटनुसार, आस्तादची ही पोस्ट ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेसंदर्भात आहे.  

‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अनामिकाचा नवरा आकाशची एन्ट्री झाली आहे.  आकाशची भूमिका अभिनेता अशोक समर्थ साकारताना दिसत आहे. मात्र   त्याचे संवाद ऐकायलाच येत नसल्याच्या तक्रारीही प्रेक्षक करताना दिसत आहेत. आता आस्ताद काळे याच मालिकेबद्दल बोलत असल्याचं नेटकरी कमेंटमध्ये सांगत आहेत. आस्ताद, अगदी मनकवडा आहेस बघ, अगदी बरोबर बोललास, अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

Web Title: aastad kale share post talk about zee marathi tv serial viral