​आमिर खानदेखील म्हणणार चला हवा येऊ द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 12:19 IST2017-03-14T06:49:50+5:302017-03-14T12:19:50+5:30

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात कंगना राणौत, काजोल, अजय देवगण, सलमान खान, इरफान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, ...

Aamir Khan would also say, let's come here | ​आमिर खानदेखील म्हणणार चला हवा येऊ द्या

​आमिर खानदेखील म्हणणार चला हवा येऊ द्या

ा हवा येऊ द्या या कार्यक्रमात कंगना राणौत, काजोल, अजय देवगण, सलमान खान, इरफान खान, अक्षय कुमार, शाहरुख खान, जॉन अब्राहम, सोनम कपूर, गोविंदा यांसारख्या अनेक बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. या सगळ्यांनी या कार्यक्रमात खूप मजा मस्ती केली आहे. हा एक मराठी कार्यक्रम असला तरी बॉलिवूडमध्येदेखील या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन या कार्यक्रमात करण्यासाठी सगळेच बॉलिवूडचे कलाकार खूपच उत्सुक असतात. आता बॉलिवूडमधील आणखी एक सेलिब्रेटी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात झळकणार आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात आता हजेरी लावणार आहे.
या खास भागाचे चित्रीकरण नुकतेच आमिरने केले आणि विशेष म्हणजे त्याने हे चित्रीकरण त्याच्या वाढदिवशी केले आहे. त्यामुळे आमिर खानने या कार्यक्रमात मजा मस्ती करण्यासोबतच त्याचा वाढदिवस चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत साजरा केला. आमिरने या कार्यक्रमात खास पाणी फाऊंडेशन या संस्थेसाठी हजेरी लावली होती. आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर पाण्याची प्रचंड समस्या आहे. त्यासाठीच पाणी फाऊंडेशन काम करते. आमिरसोबत त्याची पत्नी किरण रावनेदेखील कार्यक्रमात उपस्थिती लावली. किरण गेल्या कित्येक महिन्यांपासून पाणी फाऊंडेशनचे काम पाहात आहे. तसेच सत्यजीत भटकळदेखील या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांमधून काही शेतकरीदेखील आले होते. त्यांनी त्यांचे अनुभव, त्यांच्या कथा या कार्यक्रमाद्वारे लोकांसोबत शेअर केल्या.
आमिर खानचा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील खास भाग  पाहायला त्याचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. 



Web Title: Aamir Khan would also say, let's come here