'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये नवा ट्विस्ट, अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यामध्ये बदल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 11:12 IST2024-04-16T11:11:38+5:302024-04-16T11:12:01+5:30

Tula Shikvin Changlach Dhada : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

A new twist in 'Tula Shikvin Changlach Dhada', Akshara and Bhuvaneshwari's relationship will change? | 'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये नवा ट्विस्ट, अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यामध्ये बदल होणार?

'तुला शिकवीन चांगलाच धडा'मध्ये नवा ट्विस्ट, अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यामध्ये बदल होणार?

झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. कमी कालावधीतच या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील अधिपती आणि अक्षराची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावते. दरम्यान, या मालिकेत रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. दरम्यान आता या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेदरम्यान अक्षरा आणि भुवनेश्वरीच्या नात्यात बदल होणार का, हे पाहावे लागेल.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत प्रज्ञाशक्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी भुवनेश्वरी या स्पर्धेचा प्रथम क्रमांक पटकावते. ह्यावर्षी ती मुद्दाम स्वत: भाग न घेता अक्षराला स्पर्धेत भाग घेण्यासाठी उद्युक्त करते. भुवनेश्वरला, अक्षराला हरताना पाहायचे आहे ज्यासाठी ती हा कट रचते. अक्षराची  प्रतिस्पर्धी म्हणून ती चंचलाला या स्पर्धेत उभं करते. या स्पर्धेत अक्षराला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात.  

आता हा सर्व खडतर प्रवास पार करुन अक्षरा या स्पर्धेत विजेती होईल? भुवनेश्वरीला स्वतःच्या हाताने हाताने अक्षराला बक्षीस द्यावं लागेल? याच समारंभात चंचलाच्या सांगण्यावरुन काही बायका भुवनेश्वरीचे वाभाडे काढतात ज्याने भुवनेश्वरी  हादरते. अक्षरा त्या बायकांना सडेतोड उत्तर देते. हे सगळे बघून भुवनेश्वरीमध्ये काही बदल घडेल?  हे सगळे जाणून घेण्यासाठी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिका पाहावी लागेल.

Web Title: A new twist in 'Tula Shikvin Changlach Dhada', Akshara and Bhuvaneshwari's relationship will change?