चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:34 IST2026-05-11T12:31:45+5:302026-05-11T12:34:31+5:30

Trisha Krishnan News: दक्षिणेतील सुपरस्टार आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हजारो चाहते आणि पक्षाच्या समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या शपथविधी सोहळ्यामध्ये विजय यांची प्रेयसी आणि अभिनेत्री तृषा कृष्णन हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली होती.

Tamil Nadu: She goes to church, offers prayers in temples, what religion does Thalapathy Vijay's Girlfriend Trisha Krishnan follow? Find out | चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या

चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या

दक्षिणेतील सुपरस्टार आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हजारो चाहते आणि पक्षाच्या समर्थकांच्या उपस्थितीत झालेल्या या शपथविधी सोहळ्यामध्ये विजय यांची प्रेयसी आणि अभिनेत्री तृषा कृष्णन हिची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली होती. तिचा पेहराव, तिची विजय यांच्या कुटुंबीयांसोबतची उठबस या सर्वांचीच चर्चा या शपथविधी सोहळ्यापासून सुरू आहे. तसेच तिच्या पर्सनल लाईफबाबत जाणून घेण्याचा प्रयत्नही चाहत्यांकडून सुरू आहे. 

यामध्ये ख्रिस्ती धर्माचं पालन करणाऱ्या जोसेफ विजय याच्यासोबत रिलेशनमध्ये असलेली तृषा कृष्णन ही कोणत्या धर्माचं पालन करते. धर्माबाबत काय विचार आहेत, याबाबतही चाहत्यांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान, तृषा कृष्णनबाबत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार तिचा जन्म  चेन्नईमध्ये एका हिंदू तमिळ भाषिक कुटुंबात झाला होता. तसेच हिंदू धर्माचं पालन करते. तिचे कुटुंब हे एक तमिळ पलक्कड अय्यर ब्राह्मण आहे. पलक्कड अय्यर केरळमध्ये राहणारा तमिळ भाषिक ब्राह्मणांचा एक विशिष्ट्य समुदाय आहे. तसेच ते सुमारे ४०० ते ५०० वर्षांपूर्वी तामिळनाडूमधील  तंजावर आणि आसपासच्या भागातून येऊन पलक्कड जिल्ह्यात स्थायिक झाले होते.

अशी आहेत पलक्कड अय्यर ब्राह्मण समाजाची वैशिष्टे
पलक्कड अय्यर ब्राह्मण समाजाचं वैशिष्य म्हणजे अग्रहारम  म्हणजेच पारंपरिक गावामध्ये राहतात. तसेच त्यांच्या भाषेवर मल्याळम भाषेचा प्रभाव पडल्याने ते मल्याळम मिश्रित तमिळ भाषा बोलतात. त्याला तल्यालम असे म्हणतात. या समाजाच्या संस्कृतीमध्ये तमिळ आणि मल्याळम संस्कृतीचा आगळावेगळा संगम दिसून येतो. तसेच ते वेद आणि सात्विक परंपरांचं पालन करते.  

दरम्यान, तृषा कृष्णन ही सुद्धा हिंदू धर्माचं पालन करते. तसेच ती भगवान व्यंकटेश्वर अर्थात तिरुपती बालाजीची भक्त आहे. तिथे ती नेहमीच दर्शनाला जाते.  मात्र मिश्र समाजात राहत असल्याने ती अधूनमधून चर्चमध्येही जात असल्याचे दिसते.   
 

Web Title : तृषा कृष्णन का धर्म: चर्च जाती हैं, मंदिर में भी नमस्कार, कौन सा धर्म?

Web Summary : अभिनेत्री तृषा कृष्णन, विजय के शपथ ग्रहण समारोह में उपस्थित, एक तमिल ब्राह्मण हिंदू परिवार में पैदा हुईं। वह हिंदू धर्म का पालन करती हैं और तिरुपति बालाजी की भक्त हैं, कभी-कभी अपने मिश्रित सामाजिक दायरे के कारण चर्च भी जाती हैं।

Web Title : Trisha Krishnan's religion: Church visits, temple prayers - which faith?

Web Summary : Actress Trisha Krishnan, present at Vijay's oath, was born into a Tamil Brahmin Hindu family. She follows Hinduism and is a devotee of Tirupati Balaji, occasionally visiting churches due to her mixed social circle.