'सुलतान' चित्रपटाची धोबीपछाड कमाई, 12 दिवसांत 500 कोटींचा गल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 08:17 IST2016-07-19T08:17:01+5:302016-07-19T08:17:49+5:30
बॉलिवूड दबंग सुपरस्टार सलमान खानचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'सुलतान' चित्रपटाने अवघ्या 12 दिवसांत तब्बल 500 कोटींची विक्रमी कमाई केली आहे

'सुलतान' चित्रपटाची धोबीपछाड कमाई, 12 दिवसांत 500 कोटींचा गल्ला
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 19 - बॉलिवूड दबंग सुपरस्टार सलमान खानचा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'सुलतान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढीत सलमान खानच्या 'सुलतान' चित्रपटाने अक्षरक्ष धुमाकूळ घातला आहे. ‘सुलतान’ चित्रपटाने अवघ्या 12 दिवसांत तब्बल 500 कोटींची विक्रमी कमाई केली आहे. यश राज फिल्म्सकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
सुलतान चित्रपट अजूनही अनेक ठिकाणी दाखवण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत नवे विक्रम प्रस्थापित करेल असा अंदाज आहे. तिकीट बारीवर चित्रपट अजूनही टिकून असल्याने येत्या आठवड्यात अजून रेकॉर्ड होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नवे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्याचा परिणाम 'सुलतान'वर होऊ शकतो.
सुलतान' चित्रपटाने फक्त 3 दिवसांत 105 कोटींची कमाई केली होती. सुलतानने पहिल्या दिवशी 36.54 कोटी, दुसऱ्या दिवशी 37.30 कोटी तर तिसऱ्या दिवशी 31.50 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 'सुलतान'ने एवढी कमाई करत 6 रेकॉर्ड मोडीत काढले होती.
Shattering box office records like a true SULTAN! pic.twitter.com/KndfI4zttE— Yash Raj Films (@yrf) July 18, 2016
याअगोदर सलमानच्याच 'प्रेम रतन धन पायो'ने तिसऱ्या दिवशी 101 कोटी तर 'बजरंगी भाईजान'ने 102 कोटींचा गल्ला जमवला होता. 'सुलतान'च्या अगोदर अक्षय कुमारच्या 'एअरलिफ्ट'च्या नावे तीन दिवसात 83.50 कोटी कमावण्याचा विक्रम होता. 'सुलतान' 2016 मध्ये 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा तिसरा सिनेमा आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड 'एअरलिफ्ट' आणि 'हाऊसफुल 3' च्या नावावर होता. 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश करणारा सलमानचा हा दहावा सिनेमा आहे.
सलमानचा 'एक था टायगर' आणि 'सुलतान' हे दोन सिनेमे बुधवारी रिलीज झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक कमाईची बाजी 'सुलतान'ने मारली आहे. खेळावर आधारित चित्रपटांच्या यादीत देखील 'सुलतान' सर्वात वरील स्थानावर आहे. यापूर्वी 'भाग मिल्खा भाग'ने तीन दिवसात 52.44 कोटींची तर 'मेरी कोम'ने तीन दिवसात 12.7 कोटींचा गल्ला जमवला होता.