सगळ्यांसमोर रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी; सेटवर पसरली होती एकदम शांतता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 10:18 AM2023-08-20T10:18:06+5:302023-08-20T10:19:50+5:30

Rajinikanth: एका तामिळ सिनेमाच्या सेटवर हा किस्सा घडला होता.

when-sridevi-spat-on-rajinikanth-face-while-shooting-16-vayathinile-movie | सगळ्यांसमोर रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी; सेटवर पसरली होती एकदम शांतता

सगळ्यांसमोर रजनीकांतच्या तोंडावर थुंकली होती श्रीदेवी; सेटवर पसरली होती एकदम शांतता

googlenewsNext

दाक्षिणात्य कलाविश्वातील एक गाजलेलं नाव म्हणजे रजनीकांत (rajinikanth). आज जगभरात रजनीकांत यांचा मोठा चाहतावर्ग आहे. उत्तम अभिनयशैलीमुळे रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनात एक अनोखं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज सगळीकडे त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी लोक त्यांची पूजा करतात. परंतु, त्यांच्या बाबतीत एक अशी घटना घडली जिने सगळ्यांनाच थक्क केलं. प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (sridevi) एका चक्क रजनीकांत यांच्या तोंडावर थुंकल्या होत्या.

साऊथमध्ये ‘१६ वयथिनिले’ हा तमिळ चित्रपट बराच गाजला होता. या सिनेमामध्ये श्रीदेवी, कमल हासन आणि रजनीकांत हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या  या सिनेमामध्ये रजनीकांत यांनी परत्तई ही खलनायिकी भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे या सिनेमाचं शूट सुरु असताना श्रीदेवी चक्क रजनीकांच्या तोंडावर थुंकली होती. विशेष म्हणजे ही घटना ऐकल्यावर सगळेच जण थक्क झाले होते. परंतु, श्रीदेवी खरोखर रजनीकांत यांच्या अंगावर थुंकल्या नव्हत्या तर तो केवळ सिनेमातील एक सीन होता.

‘१६ वयथिनिले’  या सिनेमात एक सीन होता ज्यात श्रीदेवी यांना रजनीकांत यांच्या चेहऱ्यावर थुंकायचं होतं. परंतु, हा सीन करताना श्रीदेवींना प्रचंड अवघडल्यासारखं झालं होतं. त्या वारंवार रिकेट घेत होत्या. रजनीकांत हे श्रीदेवींपासून वयाने बरेच मोठे होते. त्यामुळे त्यांच्या तोंडावर थुंकणं हे श्रीदेवी यांना पटत नव्हतं. त्या काचरत होत्या.

दरम्यान, हा सीन करताना श्रीदेवी अस्वस्थ असल्यामुळे शेवटी रजनीकांत यांनी त्यांची समजूत काढली. त्यानंतर श्रीदेवी यांनी हा सीन शूट केला. मात्र, हा सीन शूट होत असताना सगळेच जण थक्क झाले होते.
 

Web Title: when-sridevi-spat-on-rajinikanth-face-while-shooting-16-vayathinile-movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.