तृषा क्रिष्णनची तुफान क्रेझ! अभिनेत्रीच्या 'करुप्पु' चित्रपटाने चार दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:57 IST2026-05-19T15:54:12+5:302026-05-19T15:57:26+5:30
. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्यामुळे अभिनेत्री तृषा क्रिष्णन सध्या खूप चर्चेत आहे. तृषाच्या या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

तृषा क्रिष्णनची तुफान क्रेझ! अभिनेत्रीच्या 'करुप्पु' चित्रपटाने चार दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी
गेल्या शुक्रवारी चित्रपटगृहात तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. एकीकडे आयुष्मान खुरानाची ‘पती पत्नी और वो २’ आणि संजय दत्तचा ‘आखिरी सवाल’ हे बॉलिवूड चित्रपट आले, तर दुसरीकडे साऊथ सुपरस्टार सूर्या आणि तृषा कृष्णन यांचा ‘करुप्पु’ (Karuppu) हा चित्रपटही रिलीज झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्यामुळे अभिनेत्री तृषा क्रिष्णन सध्या खूप चर्चेत आहे. तृषाच्या या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
आरजे बालाजी (RJ Balaji) यांनी दिग्दर्शित केलेला हा एक फँटसी ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. केवळ ३ दिवसांत जगभरात १०० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या या चित्रपटाने आता आपले बजेटही वसूल केले आहे.
४ दिवसांत बजेट पार
यापूर्वी मल्याळम ब्लॉकबस्टर चित्रपट ‘वाझा २: बायोपिक ऑफ ए बिलियन ब्रदर्स’ (Vaazha 2) ने अशीच बंपर कमाई केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला साऊथच्या कोणत्याही चित्रपटाला जे जमले नाही, ते सूर्या आणि त्रिशाच्या ‘करुप्पु’ने करून दाखवले आहे. विशेष म्हणजे सोमवारी (चौथ्या दिवशी) वर्किंग डे असूनही या चित्रपटाने १० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.
'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) रिपोर्टनुसार, चित्रपटाने सोमवारी भारतात ₹१४.३० कोटींची कमाई केली. चित्रपटाने सोमवारी तमिळ भाषेतून ₹१२.१० कोटी आणि तेलगू भाषेतून ₹२.२० कोटींचा बिझनेस केला. चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन ₹८२.३० कोटी झाले आहे. याशिवाय एकूण वर्ल्डवाईड कलेक्शन ₹१४२.३० कोटी इतके झाले आहे. त्यामुळे तृषा क्रिष्णनचा ‘करुप्पु’ चित्रपट सुपरहिट ठरलाय, हे सिद्ध झालंय.