थलापती विजय आणि तृषा कृष्णन यांचा पहिला चित्रपट कोणता? दोन दशकांपूर्वी बॉक्स ऑफिसवर घडवला होता इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:30 IST2026-05-04T17:29:48+5:302026-05-04T17:30:26+5:30

राजकीय मैदानात थलापती विजयची 'एन्ट्री' आणि त्रिशासोबतच्या नात्याची पुन्हा चर्चा; जाणून घ्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल..

Thalapathy Vijay Trisha First Movie Ghilli 2004 Chemistry Affair Tvk Politics 2026 | थलापती विजय आणि तृषा कृष्णन यांचा पहिला चित्रपट कोणता? दोन दशकांपूर्वी बॉक्स ऑफिसवर घडवला होता इतिहास!

थलापती विजय आणि तृषा कृष्णन यांचा पहिला चित्रपट कोणता? दोन दशकांपूर्वी बॉक्स ऑफिसवर घडवला होता इतिहास!

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय सध्या त्याच्या राजकीय कारकीर्दीमुळे जास्त चर्चेत आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये विजयचा 'तमिलगा वेत्री कळघम' (TVK) हा पक्ष मोठ्या बहुमताने विजयाकडे वाटचाल करताना दिसत असून, या पक्षाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अभिनेता राजकीय यशाच्या या शिखरावर असतानाच, अभिनेत्री तृषा  कृष्णन आणि विजय यांच्या अफेअरच्या चर्चांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोर धरला आहे. या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री जितकी गाजली, तितकीच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा होत असते. पण तुम्हाला माहिती आहे का, या 'पॉवर कपल'ने एकत्र काम केलेला पहिला चित्रपट कोणता होता? तर त्याबद्दल जाणून घेऊया.

विजय आणि तृषा यांनी एकत्र काम केलेला पहिला चित्रपट म्हणजे 'घिल्ली' (Ghilli) होय. हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याने बॉक्स ऑफिसवर यशाचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. या चित्रपटातील विजय आणि तृषाची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, ही जोडी रातोरात 'नंबर १' बनली.

'घिल्ली'च्या प्रचंड यशानंतर या जोडीने मागे वळून पाहिले नाही. त्यांनी एकापाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. दीर्घ काळानंतर या जोडीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. तब्बल १५ वर्षांच्या अंतरानंतर ही जोडी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लिओ' (Leo) या चित्रपटात एकत्र दिसली. त्यानंतर २०२४ मध्ये आलेल्या 'द गोट' (The GOAT) चित्रपटातही या जोडीने पुन्हा एकदा पडद्यावर आपली जादू दाखवली.

Web Title: Thalapathy Vijay Trisha First Movie Ghilli 2004 Chemistry Affair Tvk Politics 2026