"एक एक वीट लावून तयार केले वाराणसीचे घाट...", राजामौलींच्या 'वाराणसी' सिनेमाचा सेट कसा उभारला? निर्मात्यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 17:10 IST2026-05-04T17:09:02+5:302026-05-04T17:10:13+5:30

या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉमिक कॉन एक्सपीरियन्स मेक्सिको २०२६ मध्येही आपली उपस्थिती दर्शवली. जिथे निर्माता एस. एस. कार्तिकेय यांनी खऱ्या वाराणसीचे जग उभारण्याबाबत माहिती दिली.

ss rajamouli varanasi movie producer present in comic con experience | "एक एक वीट लावून तयार केले वाराणसीचे घाट...", राजामौलींच्या 'वाराणसी' सिनेमाचा सेट कसा उभारला? निर्मात्यांनी केला खुलासा

"एक एक वीट लावून तयार केले वाराणसीचे घाट...", राजामौलींच्या 'वाराणसी' सिनेमाचा सेट कसा उभारला? निर्मात्यांनी केला खुलासा

एस. एस. राजामौली यांचा आगामी चित्रपट 'वाराणसी' हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक प्रतीक्षित भारतीय चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा आहे. युरोपमधील सर्वात प्रतिष्ठित ले ग्रां रेक्स स्क्रीनवर झालेल्या ट्रेलर फेस्टिव्हलमध्ये सिनेमाची पहिली झलक दाखवण्यात आली. या प्रीव्ह्यूला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. जिथे पहिल्याच फ्रेमपासून टाळ्या, जल्लोष आणि शिट्ट्यांनी स्वागत झाले. दरम्यान, या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर कॉमिक कॉन एक्सपीरियन्स मेक्सिको २०२६ मध्येही आपली उपस्थिती दर्शवली. जिथे निर्माता एस. एस. कार्तिकेय यांनी खऱ्या वाराणसीचे जग उभारण्याबाबत माहिती दिली.

निर्माता एस. एस. कार्तिकेय यांनी कॉमिक कॉन एक्सपीरियन्स मेक्सिको 2026 मध्ये वाराणसी सादर करताना सांगितले, “कथेची सुरुवात, मध्य आणि शेवट सगळे वाराणसीमध्येच घडतात. याला भारताची आध्यात्मिक राजधानी म्हणतात आणि हे जगातील सर्वात प्राचीन, आजही वस्ती असलेल्या शहरांपैकी एक आहे. आमचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या मनात वाराणसीच्या घाटांवर काही भव्य सीक्वेन्सेस होते, जे प्रत्यक्ष ठिकाणी शूट करणे सोपे नव्हते. निर्माता म्हणून आमची जबाबदारी होती की ते शक्य करून दाखवावे. आम्ही आमच्या प्रोडक्शन डिझाइन टीमला वाराणसीला पाठवले, जेणेकरून तेथून सर्व आवश्यक तपशील, मोजमाप आणि फोटो रेफरन्स गोळा करता येतील. आणि त्यांच्या कल्पनेला वास्तवात आणण्यासाठी आम्ही वाराणसीचे घाट वीट-वीट रचून तयार केले, जेणेकरून त्यांचे व्हिजन पूर्ण होईल.”

वाराणसीमधून महेश बाबू यांचा रुद्र या भूमिकेतील दमदार लूक, पृथ्वीराज सुकुमारन यांचा कुंभा या भूमिकेतील इंटेन्स फर्स्ट लुक, आणि प्रियंका चोप्रा जोनस यांचा मंदाकिनी या रूपातील आकर्षक अवतार आधीच समोर आला आहे. या लुक्सनी सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवली असून संपूर्ण देशात उत्सुकता वाढवली आहे. या दमदार झलकांनंतर आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. कारण ते या भव्य सिनेमाई अनुभवाची आतुरतेने वाट पाहत आहेत, जो ७ एप्रिल २०२७ रोजी मोठ्या प्रमाणावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title : राजामौली की 'वाराणसी': ईंटों से घाट बने, निर्माताओं ने किया खुलासा।

Web Summary : राजामौली की 'वाराणसी' का सेट ईंट-ईंट जोड़कर बना। महेश बाबू, प्रियंका चोपड़ा और पृथ्वीराज सुकुमारन अभिनीत, फिल्म में सावधानीपूर्वक बनाए गए घाटों पर भव्य दृश्य हैं। निर्माताओं ने फिल्म के लिए वाराणसी के सार को पकड़ने के लिए किए गए प्रयासों का खुलासा किया, जो 7 अप्रैल, 2027 को रिलीज होगी।

Web Title : Rajamouli's 'Varanasi' set: Bricks built to create ghats, revealed makers.

Web Summary : Rajamouli's 'Varanasi' set recreates the holy city brick by brick. The film, starring Mahesh Babu, Priyanka Chopra, and Prithviraj Sukumaran, features grand sequences shot on meticulously crafted ghats. Producers revealed the immense effort to capture Varanasi's essence for the film, releasing April 7, 2027.