लग्नानंतर रश्मिका-विजयनं जिंकलं लोकांचं मन; तेलंगणातील ४४ सरकारी शाळांना दिले मोठं 'गिफ्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 10:21 IST2026-03-03T10:20:39+5:302026-03-03T10:21:17+5:30

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत विजय तेलुगु भाषेत तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसतो

Rashmika Mandanna-vijay devarakonda won the hearts of the people after their wedding; They gave a big 'gift' to 44 government schools in Telangana | लग्नानंतर रश्मिका-विजयनं जिंकलं लोकांचं मन; तेलंगणातील ४४ सरकारी शाळांना दिले मोठं 'गिफ्ट'

लग्नानंतर रश्मिका-विजयनं जिंकलं लोकांचं मन; तेलंगणातील ४४ सरकारी शाळांना दिले मोठं 'गिफ्ट'

अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचं अलीकडेच शाही विवाह सोहळा पार पडला. रश्मिका आणि विजयचं लग्न सिनेइंडस्ट्रीसह देशभरात चर्चेत होते. या जोडीने आपल्या वेडिंग सेलिब्रेशनमध्ये तेलंगणातील एका पाठोपाठ एक सामाजिक कार्यातून लोकांची मने जिंकली आहेत. आता या नवविवाहित जोडप्याने तेलंगणातील ४४ सरकारी शाळांसाठी मोठं गिफ्ट दिले आहे.

उदयपूर येथे लग्न केल्यानंतर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे दोघेही नागरकुरनूल जिल्ह्यातील अभिनेता विजयच्या गावी पोहचले होते. तिथे लोकांशी संवाद साधताना विजय देवरकोंडाने मोठी घोषणा केली. अभिनेता म्हणाला की, मी माझ्या देवरकोंडा चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परिसरातील ४४ सरकारी शाळांमधील ९ वी आणि १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप देण्याचं जाहीर करतो. यातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक ती मदत मिळेल आणि कुठल्याही आर्थिक अडचणीशिवाय या मुलांना त्यांचे पुढचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल यासाठी ही घोषणा करत असल्याचे त्याने जाहीर केले.

सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत विजय तेलुगु भाषेत तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसतो. ज्यात तो आपल्या शहरातील विद्यार्थ्यांसाठी दिलेले आश्वासन सांगतो. या स्कॉलरशिपचा थेट अशा विद्यार्थ्यांना फायदा होईल जे सध्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहेत असा विश्वास विजय देवरकोंडाने लोकांसमोर व्यक्त केला. सोबतच यापुढच्या काळात अधिक वेळा गावात येऊ असा शब्दही विजयने गावकऱ्यांना दिला. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांचे २६ फेब्रुवारीला उदयपूर येथे तेलुगु प्रथा परंपरेनुसार लग्न पार पडले. त्यानंतर या जोडप्याने तिरुपती बालाजी मंदिरात आशीर्वाद घेतला होता. 


दरम्यान, रश्मिका आणि विजय या दोघांनी लग्नानंतर अनेक शहरांमध्ये मिठाई वाटप केले. २ मार्चला रश्मिकाने तेलंगणातील थुम्मानपेटा येथील विजयच्या घरी गृह प्रवेश केला. या जोडप्याने विधीवत नवीन घरात सत्यनारायणाची पूजा केली. येत्या ४ मार्च रोजी हैदराबाद येथे इंडस्ट्रीतील सहकारी कलाकार, राजकीय नेत्यांसह ग्रँड रिसेप्शनचे आयोजन होणार आहे. हा सोहळा फक्त निमंत्रकांसाठीच असेल, त्यामुळे फॅन्स आणि माध्यमांना सोहळ्याला जाता येणार नाही.

Web Title: Rashmika Mandanna-vijay devarakonda won the hearts of the people after their wedding; They gave a big 'gift' to 44 government schools in Telangana