डोळ्यांत पाणी अन् पारंपरिक थाट! रश्मिका-विजयच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर, अभिनेत्री लिहिते-"तुझी बायको होऊन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:33 IST2026-02-26T19:32:22+5:302026-02-26T19:33:47+5:30
डोळ्यांत आनंदाश्रू अन् उभ्या आयुष्याची स्वप्नं! लग्नानंतर रश्मिकाची विजय देवरकोंडासाठी खास पोस्ट,'My Husband' म्हणत करून दिली ओळख

डोळ्यांत पाणी अन् पारंपरिक थाट! रश्मिका-विजयच्या लग्नाचे सुंदर फोटो समोर, अभिनेत्री लिहिते-"तुझी बायको होऊन..."
Rashmika Mandanna And Vijay Deverkonada: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील स्टार जोडी रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा हे मागील काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. अखेर आज २६ फेब्रुवारीला राजस्थानच्या उदयपुरमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. दरम्यान, चाहत्यांना आता या खास सोहळ्याच्या फोटोंची उत्सुकता होती. अशातच नुकतेच सोशल मीडियावर विजय-रश्मिकाने आपल्या लग्नाचे पोस्ट करत चाहत्यांसोबत हे आनंदाचे क्षण शेअर केले आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दरम्यान, रश्मिका आणि विजय यांनी २०१८ मध्ये 'गीता गोविंदम' या चित्रपटात एकत्र काम केलेलं. त्यानंतर ते 'डिअर कॉम्रेड' मध्ये एकत्र दिसले. एकत्र काम करताना त्यांची जवळीक वाढत गेली. रविवारी २२ फेब्रुवारी रोजी अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत नात्याची कबुली देत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. आज मोठ्या शाही थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. त्यानंतर रश्मिका आणि विजयने एकमेकांसाठी पोस्ट लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. लग्नात विजय आणि रश्मिका अगदी पारंपरिक अंदाजात पाहायला मिळत आहेत. विजय देवरकोंडाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय," एके दिवशी, मला तिची आठवण येत होती.तिची आठवण इतकी येत होती की मला असं वाटलं की ती आज जर माझ्यासोबत असती तर दिवस किती चांगला गेला असता. जेवताना ती माझ्या समोर बसली असती तरी दोन घास जास्तच जातात. जर ती माझ्यासोबत व्यायाम करत असती तर ती शिक्षा वाटत नाही.जणू काही मला तिची गरज होती. म्हणूनच मी तिला माझी बायको बनवलं आहे."
तर रश्मिकाने लिहिलंय," Hi my loves...", तुम्हाला माझ्या नवऱ्याची ओळख करून देते. मिस्टर.विजय देवरकोंडा! ज्या माणसाने मला खरे प्रेम कसं असतं हे शिकवलं,ज्या माणसाने मला शांततेत राहणे कसं असते हे दाखवून दिलं. तो माणूस जो मला दररोज सांगायचा की मोठी स्वप्ने पाहा... आणि सतत सांगायचा की मी जे काही साध्य करू शकते त्यापेक्षा खूप जास्त साध्य करण्यास मी सक्षम आहे. ज्या माणसाने मला कधीच कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखलं नाही. तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम माणूस आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी या माणसावर एक पुस्तक लिहू शकते. मी ती स्त्री बनली आहे जे मी नेहमीच स्वप्न पाहिलं होतं. मी खरोखरच धन्य आहे. विज्जू, तुझ्याबद्दलच्या माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे नेहमीच शब्द कमी पडतील. मी तुला नेहमीच हेच सांगितलं आहे. पण आता खूप अर्थपूर्ण वाटतंय, कारण माझ्याकडे तू आहेस. माझं यश, अपयश, आनंद आणि दुख हे सगळं तू जवळून पाहिलं आहेस. त्या सगळ्याचा साक्षीदार तू आहेस."
यापुढे अभिनेत्री म्हणते," तुझी आयुष्यभराची सोबती होण्यासाठी मी खूप उत्त्सुक होते. तर आता मी तुझी अधिकृतरित्या पत्नी झाले आहे. आता ही आनंद व्यक्त करण्याची वेळ आहे. चला आपण एकत्र आयुष्य जगूया. मी तुझ्यावर खूप प्रेम करते ."अशा भावना अभिनेत्रीने या पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. विजय-रश्मिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. सोशल मीडियावर नेटकरी या नवोदित जोडप्याला भरभरून शुभेच्छा देत आहेत.