बजेट १० कोटी आणि कमाई २०० कोटी! भल्याभल्या बॉलिवूड सिनेमांना 'या' सिनेमाने पछाडलं, तुम्ही पाहिलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:43 IST2026-04-23T13:40:39+5:302026-04-23T13:43:04+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. परंतु या सर्व बॉलिवूड सिनेमांना पछाडत एक सिनेमा कमी बजेटमध्ये २०० कोटींची कमाई करुन गेलाय.

malyalam movie vaazha 2 Budget 10 crores and box office collection 200 crores | बजेट १० कोटी आणि कमाई २०० कोटी! भल्याभल्या बॉलिवूड सिनेमांना 'या' सिनेमाने पछाडलं, तुम्ही पाहिलात?

बजेट १० कोटी आणि कमाई २०० कोटी! भल्याभल्या बॉलिवूड सिनेमांना 'या' सिनेमाने पछाडलं, तुम्ही पाहिलात?

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. इतकंच नव्हे या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. परंतु या सर्व बॉलिवूड सिनेमांना पछाडत एक सिनेमा कमी बजेटमध्ये २०० कोटींची कमाई करुन गेलाय. या सिनेमाचं नाव आहे 'वाझा २' (Vaazha 2).  या सिनेमाने रिलीजच्या २१ व्या दिवशीही आपली पकड मजबूत ठेवली असून, जगभरात २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

२०२४ साली आलेल्या 'वाझा' या सिनेमाचा रिमेक असलेला 'वाझा २'ची सध्या चांगलीच चर्चा आहे. 'वाझा २' या चित्रपटाने फक्त २१ दिवसांत २०० कोटी रुपयांचा आकडा पार करून एक नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाने आपल्या बजेटच्या तुलनेत तब्बल २० पट जास्त कमाई केली आहे. अवघ्या २० कोटी बजेटमध्ये हा सिनेमा तयार झाला आहे.

'सॅकनिल्क'च्या रिपोर्टनुसार, 'वाझा २'ने आपल्या रिलीजच्या २१ व्या दिवशी १.५५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०० कोटींचा टप्पा पार करून या चित्रपटाने आधीच मोठे यश मिळवले आहे, पण आता हा सिनेमा ३०० कोटी क्लबमध्ये दाखल मल्याळम सिनेमाच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड करेल का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. ज्या प्रकारे हा सिनेमा सध्या कमाई करत आहे, त्यावरून येणाऱ्या वीकेंडला सिनेमाच्या कलेक्शनमध्ये पुन्हा मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

अत्यंत कमी  बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जे वादळ निर्माण केले आहे, ते पाहून संपूर्ण चित्रपटसृष्टी थक्क झाली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, हा सिनेमा लवकरच कमाईचे विक्रम आपल्या नावावर करेल, असे चित्र दिसत आहे.

सध्या मल्याळम चित्रपटसृष्टी बॉक्स ऑफिसवर चांगलीच गाजत आहे. 'मंजुमल बॉईज' आणि 'प्रेमालू' नंतर आता 'वाझा २' ने हे सिद्ध केले आहे की, जर आशय चांगला असेल तर प्रेक्षक कोणत्याही भाषेचा सिनेमा जरी असला तरी त्याला चांगली दाद देतात. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'वाझा ३' ची मागणी आतापासूनच सुरू झाली आहे. कमी बजेटमध्ये हिट फिल्म कशी बनवावी, याचे उत्तम उदाहरण या सिनेमाने घालून दिले आहे.

Web Title : Vaazha 2: कम बजट में बनी मलयालम फिल्म ने बॉलीवुड को पछाड़ा, ₹200 करोड़ कमाए!

Web Summary : ₹10 करोड़ के बजट में बनी मलयालम फिल्म 'वाझा 2' ने 21 दिनों में दुनिया भर में ₹200 करोड़ से अधिक की कमाई की है, जो बॉलीवुड की हिट फिल्मों से भी आगे निकल गई है। फिल्म की सफलता साबित करती है कि अच्छी सामग्री भाषा की बाधाओं को पार कर जाती है, जिससे 'वाझा 3' की मांग बढ़ रही है।

Web Title : Vaazha 2: Low-budget Malayalam film surpasses Bollywood, earns ₹200 crore!

Web Summary : Malayalam film 'Vaazha 2,' made on a budget of ₹10 crore, has earned over ₹200 crore worldwide in 21 days, surpassing Bollywood hits. The film's success proves that good content transcends language barriers, sparking demand for 'Vaazha 3'.