तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी केलं 'इतकं' कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:03 IST2026-05-16T12:00:37+5:302026-05-16T12:03:24+5:30

ये बात! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाने बॉक्स ऑफिस गाजवलं, केली इतकी कमाई

karuppu movie box office collection day 1 starring suriya and trisha krishnan | तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी केलं 'इतकं' कलेक्शन

तृषा कृष्णन अन् सूर्याच्या 'करुप्पू' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी केलं 'इतकं' कलेक्शन

Kauppu Movie Box office collection: दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची क्वीन म्हणून ओळखळी जाणारी अभिनेत्री तृषा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. दरम्यान, सध्या तृषा तिच्या करुप्पू या सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. ज्या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत होते तो सिनेमा अखेर काल १५ मार्च रोजी रिलीज झाला आहे.या चित्रपटातून सूर्या आणि त्रिशा कृष्णन ही लोकप्रिय जोडी तब्बल २० वर्षांनंतर 'करुप्पु' चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र पडद्यावर परतली आहे. हा अॅक्शन ड्रामा चित्रपटगृहात प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. चला तर मग जाणून घेऊया की चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली.

साऊथ स्टार सूर्या आणि तृषा कृष्णनची मुख्य भूमिका असलेला 'करुप्पु' हा चित्रपट ठरलेल्या तारखेपेक्षा एक दिवस उशीराने चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तिकीटबारीवर चांगली कमाई केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सूर्या आणि तृषा कृष्णनच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ४८९१ शोजमधून १४.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर त एकूण ४.०० कोटींची कमाई केली असून, त्यामुळे चित्रपटाची एकूण कमाई २०.६६ कोटींवर पोहोचली आहे.

'करुप्पु' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, दिग्दर्शक आर. जे. बालाजी यांच्या या सिनेमात सूर्या, त्रिशा कृष्णन, योगी बाबू यांच्या भूमिका आहेत. हा एक ॲक्शन-ड्रामा चित्रपट असून यात सूर्या आणि तृषा वकिलांच्या भूमिकेत आमनेसामने दिसत आहेत.

Web Title : तृषा कृष्णन और सूर्या की 'करुप्पू' ने बॉक्स ऑफिस पर मचाया धमाल!

Web Summary : तृषा कृष्णन और सूर्या की 'करुप्पू' 20 साल बाद रिलीज हुई, पहले दिन भारत में ₹14.40 करोड़ कमाए। विश्व स्तर पर, फिल्म ने ₹20.66 करोड़ की कमाई की। यह एक्शन-ड्रामा फिल्म में सूर्या और तृषा वकील के रूप में हैं।

Web Title : Trisha Krishnan and Surya's 'Karuppu' rocks box office, earns big!

Web Summary : Trisha Krishnan and Surya's 'Karuppu' released after 20 years, earning ₹14.40 crore in India on its first day. Globally, the film grossed ₹20.66 crore. This action-drama features Surya and Trisha as lawyers.