"मला तामिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचंय"; थलापतीच्या विजयानंतर तृषा कृष्णनचा जुना व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 15:48 IST2026-05-05T15:45:53+5:302026-05-05T15:48:25+5:30

तृषा कृष्णनचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

I Want to Be the CM of Tamil Nadu Trisha Krishnan’s Old Video Viral After Thalapathy Vijay’s Election Win | "मला तामिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचंय"; थलापतीच्या विजयानंतर तृषा कृष्णनचा जुना व्हिडीओ व्हायरल

"मला तामिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचंय"; थलापतीच्या विजयानंतर तृषा कृष्णनचा जुना व्हिडीओ व्हायरल

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयच्या 'तमिळगा वेटी कळघम' (TVK) पक्षानं मे २०२६ मधील विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरून कोणाशीही युती न करता, स्वबळावर विजयने ही निवडणूक लढवून मोठे यश मिळवले आहे. हे यश पाहता विजय हा तमिळनाडूचा पुढील मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता विजयची कथित गर्लफ्रेंड तृषा कृष्णन चर्चेत आली आहे. तिचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिनं तामिळनाडूची मुख्यमंत्री होण्याची ईच्छा व्यक्त केली होती. 

२००४ मधील एका जुन्या मुलाखतीत तृषाला तिच्या भविष्यातील ध्येयाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्हा तिने गंमतीने म्हटले होते, "मला तामिळनाडूची मुख्यमंत्री व्हायचे आहे. खरंच! फक्त वाट पाहा". तिने असेही नमूद केले होते, की ती पुढील १० वर्षांत हे ध्येय साध्य करेल. मुख्यमंत्री झाल्यावर काय करणार? या प्रश्नावर तिने हसत उत्तर दिले, "आधी तुम्ही मला मत द्या, मग मी सांगेन". आता थलापती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज झाला असताना चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केली की, "सरस्वती दिवसातून एकदा जिभेवर बसते, तिचे बोल खरे ठरले".

विजय आणि तृषाच्या डेटिंगच्या चर्चा

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि तृषाच्या डेटिंगच्या चर्चा होत्या. विजयच्या पत्नीच्या आरोपानंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली. विजय एका अभिनेत्रीला डेट करतोय, असा आरोप त्याच्या पत्नीनं केलेला. त्यानंतर एका लग्न समारंभातही विजय आणि तृषा कृष्णन एकत्र दिसले होते. दोघांनी यावर अद्याप कोणीतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, काल निवडणूक निकालानंतर तृषा विजयच्या घरी त्याला शुभेच्छा देण्यासाठीही गेली होती. 

विशेष म्हणजे, काल ४ मे रोजी तृषाचा ४३ वा वाढदिवस होता. चेन्नईमध्ये ४ मे १९८३ रोजी जन्मलेल्या तृषासाठी यंदाचा वाढदिवस दुहेरी आनंदाचा ठरला, कारण याच दिवशी तिचा खास मित्र विजयच्या पक्षाने निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तिने तिरुपती मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले होते. तिची ही मंदिर भेट पाहूनच चाहत्यांनी विजयच्या विजयाची खात्री व्यक्त केली होती, जी निकालाच्या दिवशी खरी ठरली.

Web Title : तमिलनाडु की मुख्यमंत्री बनने की इच्छा रखने वाली तृषा का पुराना वीडियो वायरल।

Web Summary : विजय की राजनीतिक जीत के बीच, तृषा का तमिलनाडु की मुख्यमंत्री बनने की इच्छा व्यक्त करने वाला एक पुराना वीडियो फिर से सामने आया। चुनाव जीतने के बाद तृषा ने विजय को बधाई दी। अभिनेत्री ने उसी दिन अपना 43वां जन्मदिन मनाया।

Web Title : Trisha's old video of wanting to be Tamil Nadu CM goes viral.

Web Summary : Amidst Vijay's political win, an old video of Trisha expressing her desire to become Tamil Nadu's CM resurfaces. Dating rumors continue as she congratulated Vijay after the election victory. The actress celebrated her 43rd birthday on the same day.