पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 14:02 IST2024-10-31T14:01:36+5:302024-10-31T14:02:25+5:30

आगामी 'पुष्पा २'चं दिवाळीनिमित्त हटके पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालंय (pushpa 2)

Happy Diwali from Pushparaj and Srivalli Pushpa 2 new poster release date | पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

पुष्पाराज आणि श्रीवल्लीकडून दिवाळीच्या हटके शुभेच्छा, 'पुष्पा २'चं नवीन पोस्टरने वेधलं सर्वांचं लक्ष

'पुष्पा २' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. अल्लू अर्जुन पुन्हा एकदा 'पुष्पा २' सिनेमाच्या माध्यमातून त्याच्या खास स्वॅगमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. याशिवाय अभिनेता फहाद फाजिलसुद्धा पुन्हा एकदा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून पुष्पाला टक्कर द्यायला सज्ज आहे. अशातच आज दिवाळीनिमित्त 'पुष्पा २'चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलीय. 

दिवाळीनिमित्त 'पुष्पा २'चं नवीन पोस्टर

दिवाळीनिमित्त 'पुष्पा २' चं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना एकत्र दिसत आहेत. रश्मिका हिरव्या साडीत असून तिने डोक्यावर टॉवेल बांधला आहे. तर अल्लु अर्जून तिच्याशी फ्लर्ट करताना दिसतंय. श्रीवल्ली पुष्पाकडे रागाने बघताना दिसतेय. हे खास पोस्टर शेअर करुन 'पुष्पा २'च्या टीमने सर्वांना दिवाळीच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी या नव्या पोस्टरला खूप पसंती दिलीय. 


'पुष्पा २' या तारखेला होणार रिलीज

अल्लू अर्जुनने त्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरुन 'पुष्पा २' सिनेमाचं नवं पोस्टर शेअर करत सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. आता 'पुष्पा २'साठी प्रेक्षकांनी फक्त काही दिवसच वाट पाहावी लागणार आहे. कारण ५ डिसेंबरला अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी आहेत. लवकरच सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पुष्पा'नंतर 'पुष्पा २'ची  सर्वांना उत्सुकता आहे.

Web Title: Happy Diwali from Pushparaj and Srivalli Pushpa 2 new poster release date